AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका चर्चेसाठी चेकाळला, इराणच्या मनात मात्र वेगळंच…होर्मुझमध्ये घनघोर युद्ध होणार?

अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची दुसरी फेरी इस्लामाबादमध्ये होणार आहे. बुधवारी शस्त्रसंधीची मुदत संपणार आहे. त्यामुळे या चर्चेच्या फेरीला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. नेमकं काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

अमेरिका चर्चेसाठी चेकाळला, इराणच्या मनात मात्र वेगळंच...होर्मुझमध्ये घनघोर युद्ध होणार?
donald trump and mojtaba khamenei and strait of hormuzImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2026 | 3:01 PM
Share

America Iran War :  सध्याचे युद्ध संपवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे. दोन्ही देशांत झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामाची मुदत बुधवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे आता चर्चेची दुसरी फेरी न झाल्यास युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे सध्या दोन्ही देशांची भूमिका पाहता युद्ध पुन्हा सुरु होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एकीकडे चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न केला जात असताना आता मोठी माहिती समोर आली आहे. इराणने अजूनही इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी पोहोचलेले नाहीत.

नेमकं काय घडतंय?

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्या प्रतिनिधी मंडळाची चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पाकिस्तान दोन्ही देशांशी सातत्याने चर्चा करत आहे. अमेरिकेने चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी उघडपणे तयार असल्याचे सांगितले आहे. परंतु इराणच्या भूमिकेबाबत संभ्रण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजूनही इराणने आपला कोणताही प्रतिनिधी इस्लामाबदला पाठवलेला नाही. इराणी संसदेचे अध्यक्ष तथा या चर्चेसाठीचे इराणचे प्रमुख नेते कालिबाफ हे अजूनही इराणमध्येच आहेत. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची हेदेखील इराणमध्येच आहेत. इतर कोणतीही टीम अद्याप इराणमध्ये पाठवण्यात आलेली नाही.

अमेरिकेची काय भूमिका?

दुसरीकडे अमेरिका मात्र चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार आहे. त्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हेन्स हे इस्लामाबादमध्ये जाणा आहेत. बुधवारी दुपारपर्यंत ते इस्लामाबादमध्ये पोहोचतील. त्यामुळे इराण-अमेरिकेत बुधवारी चर्चा होऊ शकते.

तर युद्धाचा भडका उडणार

दरम्यान, बुधवारी शस्त्रसंधीची मुदत संपणार आहे. दोन्ही देशांत बुधवारी चर्चा घडवून न आल्यास आणि अमेरिकेच्या अटी इराणने मान्य न केल्यास भविष्यात मोठं युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या बैठकी आधीच मोठं घडतंय! अलीकडेच शिंदेंची भेट घेणार आष्टीकर
ठाकरेंच्या बैठकी आधीच मोठं घडतंय! अलीकडेच शिंदेंची भेट घेणार आष्टीकर उस्थित राहणार? स्वतःच केला खुलासा
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...