हा तर क्लिअर कट भारताचाच विजय; जगातील दोन मोठ्या मिलिट्री एक्सपर्टकडून शिक्कामोर्तब
ऑपरेशन सिंदूरनंतर ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन लष्करी तज्ज्ञांनी भारताच्या स्पष्ट विजयाची पुष्टी केली आहे. पाकिस्ताननेच शस्त्रसंधीसाठी विनंती केल्याचे या दोन्ही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाण्यांवर केलेल्या अचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानचे संरक्षण यंत्रणा निष्क्रिय ठरल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने खोट्या गोष्टी पसरवण्यास सुरुवात केली आहे. खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन मिलट्री एक्सपर्ट टॉम कूपर आणि अमेरिकेचे युद्ध तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांनी पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारचा बुरखा फाडला आहे. या दोन्ही मिलिट्री तज्ज्ञांनी गेल्या तीन चार दिवस चाललेल्या लढाईत भारताचाच विजय झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी भारताला केविलवाणेपणे साकडं घातलं. त्यात काही नवीन नव्हतं. कारण पाकिस्तानचं एवढं नुकसान झालं होतं की त्यामुळे पाकिस्तान घाबरला होता. त्यामुळेच शस्त्रसंधी करण्याशिवाय पाककडे पर्याय उरला नव्हता, असं या दोन्ही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. टॉम कूपर हे जगातील...
