Operation Sindoor : हो, भारताने घुसून मारले, शहाबाज शरीफ यांची मोठी कबुली,दणका लागला, पण कुठे? काय काय म्हणाले?
Nur Khan Airbase Strike : पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अखेर भारताने घुसून मारल्याचा कुबलीनामा दिला. 10 मे रोजी भारतीय बॅलेस्टिक मिसाईलने नूर खान एअरबेससह अनेक ठिकाणं नष्ट झाल्याचे स्वीकार केले. स्वत:ला दहशतवाद आणि अणवस्त्रांचा 'चौधरी' समजणार्या पाकड्यांचे भारताने कंबरडे मोडले. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव वाढला. 6 आणि 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तान घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकने भारताविरोधात ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले. त्याला जोरदार प्रत्युतर देण्यात आले. पाकिस्तानातील 13 मधील 11 एअरबेसवर निशाणा साधण्यात आला. स्वत:ला दहशतवाद आणि अणवस्त्रांचा ‘चौधरी’ समजणार्या पाकड्यांचे भारताने कंबरडे मोडले. या हल्ल्याच्या 8 दिवसानंतर पाकिस्तान पंतप्रधान यांनी भारताने हे एअरबेस नष्ट केल्याचे मान्य केले.
मुनीर यानेच दिली पंतप्रधानांना माहिती
भारताला वारंवार ललकारणारा लष्कर प्रमुख सय्यद असीम मुनीर याला या कारवाईत माती खावी लागली. शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याची माहिती दिली. त्यानुसार 9-10 मे रात्री जवळपास 2:30 वाजता जनरल सय्यद असीम मुनीर याने त्यांना कॉल केला. भारतीय बॅलेस्टिक मिसाईल नूर खान एअरबेस आणि काही इतर भागावर डागण्यात आले आणि त्यात मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. एअरबेस वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मुनीर याने दिल्याची माहिती शरीफ यांनी दिली.
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा पाकडे करत होते. पण भारताने नुकसानीचे छायाचित्र जगासमोर मांडली होती. यानंतर पाकिस्तान आणि मुनीर हे सातत्याने त्याचे खंडन करत होते. पण अखेर त्यांनी भारताने घुसून हल्ले केल्याचे त्यात जीवित हानी झाली आणि हवाईतळांचे मोठे नुकसान झाले.
भारताच्या दाव्याला दुजोरा
भारत आणि पाकिस्तान तणावानंतर 10 मे रोजी पाकिस्तानकडून गयावया करण्यात आल्या आणि त्यानंतर युद्ध विरामावर सहमती झाला. त्यापूर्वी भारताने एअरबेसवर निशाणा साधला. या हल्ल्यात पाकिस्तानचे नूर खान एअरबेस पूर्णपणे नष्ट झाले. हा दावा भारताने त्याच दिवशी केला होता. हा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान हादरून गेला. चीन आणि तुर्कस्तानकडून येणाऱ्या शस्त्रांचा वापर करत याच विमानतळावरून भारताविरोधात मोठे ऑपरेशन राबवण्याचे मुनीरचे स्वप्न आपल्या लष्कराने धुळीस मिळवले. आता शरीफ याने भारताच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.
