पाकिस्तानची बत्ती गुल्ल; राजधानी इस्लामाबादसह अनेक शहरं अंधारात

पाकिस्तानमध्ये (Pakistan) राजधानी इस्लामाबदसह अनके प्रमुख शहरांची शनिवारी (7 जानेवारी) रात्री अचानकपणे बत्ती गुल्ल झाली. (Pakistan electricity supply)

पाकिस्तानची बत्ती गुल्ल; राजधानी इस्लामाबादसह अनेक शहरं अंधारात
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 8:01 AM

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) राजधानी इस्लामाबदसह अनके प्रमुख शहरांची शनिवारी (7 जानेवारी) रात्री अचानकपणे बत्ती गुल्ल झाली. अचानकपणे विजेचा पुरवठा खंडित झाल्यामुळे पाकिस्तानची काही शहरं काल रात्री अंधारात होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा (electricity supply) खंडित झाल्यामुळे जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Pakistan electricity supply has been cut off on saturaday)

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये (Pakistan) शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित (Power Blackout) झाला. रात्री अनेक शहरांमध्ये अचानक अंधार झाला. या प्रकाराची दखल थेट पाकिस्तानच्या उर्जामंत्रालयाला घ्यावी लागली. उर्जामंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती देत ट्रान्समिशन यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे फ्रिक्वेन्सीमध्ये अचानक बदल झाला. याच कारणामुळे पाकिस्तानमध्ये देशव्यापी वीजपुरवठा खंडित झाला. पाकिस्तानी उर्जामंत्रालयानुसार वीजपुरवठ्यामध्ये शनिवार रात्री 11.41 वाजता तांत्रिक बिघाड झाला.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

देशातली महत्वाच्या शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली होती. अचानकपणे वीज जाण्यामागचं कारण काय याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. याबाबत अधिकची माहिती सांगताना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे सहाय्यक शाहबाज गिल यांनी उर्जामंत्री विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतर नागरिकांना याबाबत माहिती दिली जाईल, असेही शाहबाज गिल म्हणाले.

या शहरांमध्ये बत्ती गुल्ल

यावेळी पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. कराची, लाहोर, इस्लामाबाद, मुल्तान, कसूर या शहरांतील नागरिकांनी या ब्लॅकआऊटबद्दल सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली होती. कराचीच्या एका नागरिकांने सांगितल्याप्रमाणे मुल्तान, लाहोर, इस्लामाब या शहरांसोबतच अनेक प्रमुख शहरांमध्ये विजपुरवठा खंडित झाला होता.

दरम्यान, येथे तांत्रिक गटाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यावर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. क्रमबद्ध पद्धतीने या शहरांचा वीजपुरवठा सुरळीत केला जातोय. पाकिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार रात्री उशिरा संगजनी आणि मर्दन ग्रिड या भागात वीजपुरवठा सुरळीत झाला होता.

संबंधित बातम्या :

दहशतवादी मसूद अजहरला 18 जानेवारीपर्यंत बेड्या ठोका, पाकिस्तानी न्यायालयाचे आदेश

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पाकिस्तानात 15 वर्षांची शिक्षा

मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याची 12 वर्षे, पाकिस्तानची पोलखोल करणारे ‘सात मुद्दे’

(Pakistan electricity supply has been cut off on saturaday)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.