AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भव्यदिव्य स्वागत, सर्वोच्च सन्मान, BRICKS संमेलन…कशी होती पीएम मोदींची ब्राझील यात्रा, Video पाहा

PM Modi Brazil Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलसह इतर देशांचा दौरा केला. या दौऱ्यात ते ब्रिक्स संमेलनात सहभागी झाले. अनेक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या दौऱ्यात त्यांचा काही देशांनी सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला.

भव्यदिव्य स्वागत, सर्वोच्च सन्मान, BRICKS संमेलन...कशी होती पीएम मोदींची ब्राझील यात्रा, Video पाहा
नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा दौराImage Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jul 09, 2025 | 2:09 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी 5 देशांच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील दौऱ्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर या दौऱ्याची माहिती आणि खास फोटो शेअर केले. त्यांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी ब्राझील आणि भारतातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला.

पीएम मोदी यांनी ब्राझील दौऱ्यानंतर सोशल मीडिया एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात भारत आणि ब्राझील यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होण्याचा आशय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये पहिल्या ब्रिक्स संमेलनात सहभागी झाले. मग ते सोमवारी ब्रासिलिया येथे पोहचले. ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोस मुसियो मोंटेइरो फिल्होने त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रासिलिया येथील विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी पारंपारीक ब्राझिलियाई सांबा रेगे नृत्य सादर केले. यावेळी शिव स्त्रोत्र, गणेश वंदना आणि इतर भारतीय परंपरांचे दर्शन येथे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6-7 जुलै रोजी रियो डी जेनेरियो येथील ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी झाल्यानंतर ब्रासिलिया येथे पोहचले.

या यात्रेदरम्यान ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला डी सिल्वा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि जागतिक मंचावर दोन्ही देशांमध्ये सहयोग वाढवल्याबद्दल देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने मोदींना सन्मानित करण्यात आले.

अनेक मुद्यांवर द्विपक्षीय वार्ता

परदेश मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांच्याशी, व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, उद्योग, औद्योगिकीकरण, कृषी, आरोग्य आणि दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यासंदर्भात व्यापक चर्चा केली. तर अनेक करार दोन्ही देशांमध्ये झाले.

PM मोदी ब्रिक्स संमेलनात सहभागी

इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स संमेलन अत्यंत फलदायी ठरल्याची माहिती दिली. या संमेलनादरम्यान पंतप्रधानांनी जगातील अनेक बड्या नेत्यांशी अनेक विषयावर गहन चर्चा केली. या संमेलनातून भारताची जागतिक मंचावर एका विश्वसनीय मित्र म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.