कोणत्या राज्यात महिलांना किती आरक्षण? समांतर आरक्षणाचा लाभ कोणाला? बिहारमध्ये 35% आरक्षणाची घोषणा, विधीज्ञांनी दाखवला आरसा
Women Reservation Quote in States: बिहार सरकारने राज्यातील महिलांना सरकारी नोकर्यांमध्ये 35 टक्के आरक्षणाच्या निर्णयाला नवीन मुलामा लावला आहे. आता मूळ रहिवाशी महिलांना त्याचा लाभ होईल. बिहारच्या निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे नितीश कुमार यांची ही खेळी फायदेशीर ठरू शकते. या निर्णयाचे आरक्षणासंदर्भात काय परिणाम होतील? कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांना काय वाटते, जाणून घेऊयात...

बिहार निवडणुका आता हातातोंडाशी आहेत. निवडणुका आल्या की प्रलोभनं, आमिषं आणि अर्थात योजनांचा सुकाळ असतो. मतांचा दुष्काळ संपवण्यासाठी ‘चुनावी जुमले‘ देण्याची प्रथा, परंपरा पार स्वातंत्र्यकाळापासून आहे. बिहारमध्ये महिलांना सरकारी नोकर्यांमध्ये 35 टक्के आरक्षणाचा निर्णय ही त्यातील पुढची कडी म्हणावी लागेल. नितीश कुमार सरकारने एक छोटासा बदल करून स्थानिक महिला मतदारांची नाराजी दूर केली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. बिहारमधील मूळ रहिवाशी महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकर्यांमध्ये 35 टक्के आरक्षणाचा फायदा घेता येईल. पूर्वी सरसकट सर्व महिलांना बिहारमधील सरकारी नोकऱ्यांमध्ये 35 टक्के आरक्षणाची तरतूद होती. त्यात बदल करण्याची खेळी नितीश सरकारने खेळली आहे. त्याची गोळाबेरीज निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये दिसलेच. function loadTaboolaWidget() { window._taboola = window._taboola || []; var isMobile = (typeof is_mobile !== 'undefined') ? is_mobile() : false; ...
