समुद्रात खळबळ! भारतासह पाकिस्तानातील काही भागात इंटरनेट सेवा खंडीत, समुद्राखालील केबल…
समुद्रात टाकलेल्या अनेक सागरी फायबर ऑप्टिक केबल्स एकाच वेळी कापल्या गेल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीये. यामुळे त्याचा थेट परिणाम हा मोबाईल आणि लॅपटॉपच्या इंटरनेट सेवेवर झाला आहे. काही भागात इंटरनेट सेवा पूर्ण खंडीत झाली आहे तर काही भागांमध्ये इंटरनेटला समस्या येत आहे.

तुमच्या मोबाईल, लॅपटॉपला जर इंटरनेटची समस्या येत असेल तर तुम्ही ऐकटे नाहीत. जवळपास लोकांना आज ही समस्या जाणवत आहे. समुद्राखालील केबल खंडित झाल्याने भारतासह पाकिस्तान आणि आशियातील काही भागांमध्ये इंटरनेटला समस्या होतंय. समुद्रात टाकलेल्या अनेक सागरी फायबर ऑप्टिक केबल्स एकाच वेळी कापल्या गेल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीये. यामुळेच इंटरनेट अचानक बंद पडण्याची समस्या निर्माण झाली. अचानक काही केबल तुटल्या गेल्या.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही समुद्राखालील केबल लाईन नेमकी कोणत्या कारणाने कट झाली, याबद्दल अधिक माहिती ही सध्यातरी मिळू शकली नाहीये. मात्र, याचा परिणाम लोकांच्या इंटरनेटवर झाला. इंटरनेट अॅक्सेसवर लक्ष ठेवणाऱ्या नेटब्लॉक्सने या घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना म्हटले की, समुद्राच्याखालील केबल खंडित झाल्याने अनेक देशांमध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी बिघडली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांचा समावेश आहे.
इंटरनेट सेवा स्लो झाल्याने त्याचा थेट परिणाम होताना दिसतोय. कॉल ड्रॉप, व्हिडिओ कॉलिंगमध्ये आवाज जाऊन परत कॉल जोडला जातोय. गुगलवर काही सर्च केले तर लवकर माहिती न मिळणे अशा काही समस्यांना लोक सामोरे जात आहेत. हेच नाही तर यादरम्यान डिजिटल पेमेंटवरही परिणाम झाला. इस्रायल-हमास युद्धावर दबाव आणण्याच्या प्रयत्नात हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील केबल्सना टार्गेट केल्याबद्दल यापूर्वी चिंता व्यक्त केली जात होती. त्यामध्येच आता हा प्रकार घडलाय. आशिया, मध्य पूर्व पश्चिम युरोपची केबल ही टाटा कम्युनिकेशन्सद्वारे चालवली जाते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, आंतरराष्ट्रीय केबल्सवर परिणाम झाला आहे.
परंतु, कोणत्या सिस्टीमचे नुकसान झाले आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मुळात म्हणजे समुद्राखाली या केबल्सची दुरुस्ती करणे सोपे नाही. या सर्व कामासाठी पुढील काही आठवडे लागू शकतात. नेमके कुठे हे केबल कट झाले, याची माहिती घेऊन जहाजे तिथे पाठवावी लागतील. तांत्रिक काम करण्यासाठी खोल पाण्यात काम करावे लागेल. हेच नाही तर या कामासाठी परवान्या देखील घ्याव्या लागतात. काही भाग संवेदनशिल आहे.
