टेरर फंडिंग प्रकरण: जमात-उद-दावाच्या सहा दहशतवांद्यांची निर्दोष मुक्तता

पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने  (Lahore High Court) मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा संघटनेतील सहा दहशतवाद्यांची निर्दोष सुटका केली आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

टेरर फंडिंग प्रकरण: जमात-उद-दावाच्या सहा दहशतवांद्यांची निर्दोष मुक्तता
हाफिज सईद

लाहोर – पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने  (Lahore High Court) मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा संघटनेतील सहा दहशतवाद्यांची निर्दोष सुटका केली आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. कनिष्ठ न्यायालयाने या साहाही दहशतवाद्यांना दोषी ठरवले होते. मात्र वरिष्ठ न्यायलयाने या सर्वांची निर्दोष सुटका केली आहे. हाफिज सईद हा जमात -उद दावा या संघटनेचा प्रमुख असून 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा तो सूत्रधार आहे. या हल्ल्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांसोबत एकूण 166 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता.

पुराव्याभावी सुटका 

पाकिस्तानच्या कनिष्ठ न्यायालयाने दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्या प्रकरणात या सहा जणांना दोषी ठरवले होते. यामध्ये सईदच्या मेव्हुण्याचा देखील समावेश होता. सईदचा मेव्हुणा हाफिज अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांची तर संघटनेचे प्रवक्ते असलेल्या नसरुल्ला, समीउल्लाह आणि उमर बहादुर  यांना प्रत्येकी 9 वर्षांची सजा सुणावण्यात आली होती. तसेच त्यांची संपत्ती देखील जप्त  करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आरोपींकडून कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मुख्य न्यायाधीश मोहम्मद अमीर भट्टी आणि न्यायमूर्ती सलीम शेख यांच्या खंडपिठापुढे या प्रकरणाची सुनावनी झाली. आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे यावेळी न्यायालयाने म्हटले.

कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना कडेकोट बंदोबस्तामध्ये लाहोर उच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते. संबंधित आरोपींचे  उपलब्ध पुराव्यावरून संघटनेशी संबंध असल्याचे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

संबंधित बातम्या 

पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का, दिल्लीत आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; मोदी-शहा आखणार नवी रणनीती

Sierra Leone Blast: इंधन टँकर विस्फोटात किमान 91 जणांचा मृत्यू; सिएरा लिओनमध्ये भयंकर अपघात

Texas: Astroworld Music Festival अपघातात 8 मृत्यू, जवळपास 300 लोक जखमी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI