Britain Retail Market : गोऱ्या साहेबांना पण महागाईचे चटके! मॉल्समध्ये शुकशुकाट, खरेदीवरही निर्बंध

Britain Retail Market : गोऱ्या साहेबांच्या देशात सध्या फळ आणि भाजीपाल्याचा तुटवडा आहे. गोऱ्या साहेबांनाही महागाईचे चटके बसत आहे. सुपरमार्केट्स, मॉल्स, दुकाने, बाजारात प्रचंड तुटवडा आहे. या तुटवड्या मागील कारणे काही ही असली तरी त्यामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.

Britain Retail Market : गोऱ्या साहेबांना पण महागाईचे चटके! मॉल्समध्ये शुकशुकाट, खरेदीवरही निर्बंध
तुटवडा
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 4:39 PM

नवी दिल्ली : श्रीलंकेनंतर पाकिस्तानच्या (Pakistan) दिवाळखोरीची जगात जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय न्यूज चॅनल्स आणि समाज माध्यमांमध्ये तर पाकिस्तान भीकेला लागल्याचे वार्तांकन करण्यात येत आहे. आता काही माध्यमांनी गोऱ्या साहेबांचा देश द ग्रेट ब्रिटेन (Britain) पण पाकिस्तानच्या मार्गाने जात असल्याचा दावा केला आहे. इंग्लंडच्या सुपरमार्केट्स, मॉल्समध्ये सध्या फळ आणि भाजीपाल्याचा तुटवडा (Shortage) आहे. रॅक, शेल्फ रिकामी झाली आहेत. त्यामुळे सुपरमार्केट्स, मॉल्स, दुकाने ओस पडली आहेत. अर्थात या तुटवड्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

दैनिक भास्करने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, ब्रिटेनमधली सर्वात मोठी सुपरमार्केट्स एल्डि, मॉरिसन, अस्दा आणि टेस्कोने भाजीपाल्याच्या खरेदीवर मर्यादा आणली आहे. त्यानुसार, एका मर्यादेपर्यंत ग्राहकांना भाजीपाला खरेदी करता येणार आहे. ग्राहकांनी एकदाच भाजीपाला, फळांची खरेदी करुन साठवण करु नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

ग्राहक बटाटे, काकडी, कांदे, टमाटे आणि शिमला मिरची यांची एकदम खरेदी करु शकत नाही. पैसे असतानाही ग्राहकांना तुटवड्यामुळे भाजीपाला खरेदीस मनाई करण्यात आली आहे. त्यांना एका मर्यादीत स्वरुपात या वस्तू खरेदी करता येतील. परिस्थिती इतकी बिकट आहे की, एक व्यक्ती केवळ 2 ते 3 टमाटेच खरेदी करु शकतो. पाव, अर्धा किलो, किलोची गोष्ट तर दूरच आहे.

हे सुद्धा वाचा

हा तुटवडा काही शहरांपुरता मर्यादीत असल्याचा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. संपूर्ण देशातच भाजीपाला आणि फळांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. देशातील जवळपास सर्वच सुपरमार्केट, छोटी दुकाने, छोट्या बाजारपेठेतच हेच विदारक चित्र आहे. बटाटे, कांदे एकदम गायब झाले आहेत. काही शहरात तर ग्राहकांना अवघे 2 ते 3 बटाटे खरेदी करता येत आहेत. यावरुन सध्याच्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. महागाईने इंग्लंडमध्ये कळस गाठला आहे.

महागाईचे चटके गोऱ्या साहेबांनाही सहन करावे लागत आहे. ब्रिटेनची अर्थव्यवस्था जगातील दहा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील एक आहे. पण सध्या या देशात फळ आणि भाजीपाल्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे येथील मोठं-मोठ्या सुपरमार्केटसनी खरेदीवर निर्बंध घातले आहेत. मीडिया अहवालानुसार, पूर्वी लंडनमधील अनेक दुकाने ओस पडली आहेत. लोकांना अनेक ठिकाणी फिरुनही फळे आणि भाजीपाला मिळत नसल्याचे चित्र आहे.

थंडीच्या काळात इंग्लंड भाजीपाला आणि फळांची आयात करतो. टमाटे, काकडी, मिरची महागड्या भावाने इतर देशांकडून आयात करण्यात येते. इंग्लंड थंडीच्या काळात जवळपास 90 टक्के हिरवा भाजीपाला आयात करतो. बर्फ पडल्याने या देशातील उत्पादन प्रचंड घसरते. या काळात ब्रिटेनमध्ये केवळ 5% टमाटे आणि 10% हिरवा भाजीपाला उत्पादित होतो. हवामानातील बदलाचा यंदा भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशात अजून काही काळ दैनंदिन वापरातील खाद्यान्नाचा तुटवडा जाणवणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.