तिघांच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये ‘मॅक्सिमम अलर्ट’, भारत सोबत असल्याचं सांगत मोदींकडून धीर

फ्रान्समधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारत फ्रान्ससोबत असल्याचं सांगत मॅक्टोन यांना धीर दिला आहे.

तिघांच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये ‘मॅक्सिमम अलर्ट’, भारत सोबत असल्याचं सांगत मोदींकडून धीर
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 5:31 PM

पॅरिस : फ्रान्सच्या नीस शहरातील हत्याकांडानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी देशात सर्वोच्च स्तरावरील सतर्कतेचा (Maximum Alert) सुरक्षा अलर्ट घोषित केला आहे. गुरुवारी (29 ऑक्टोबर) नीस शहरात एका हल्लेखोराने चाकूने हल्ला करत 3 लोकांचा जीव घेतला. या हल्ल्यात इतर काही लोकही जखमी झाले आहेत. नीसमधील चर्चमध्ये हल्ला करणारा आरोपी 21 वर्षांचा असून ट्यूनीशियाचा नागरिक असल्याचं सांगितलं जातंय. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारत फ्रान्ससोबत असल्याचं सांगत मॅक्टोन यांना धीर दिला आहे (Three killed outside church in nice France on maximum alert PM Modi Support Macron).

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सच्या नीस शहरातील हल्ल्याचा निषेध केला आहे. मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे, ‘मी नीसमधील चर्चमध्ये झालेल्या निर्घृण हत्येसह नुकतेच फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करतो. आमच्या संवदेना या हल्ल्यातील पीडितांसह फ्रान्सच्या जनतेसोबत आहेत. दहशतवादाविरोधातील या लढाईत भारत फ्रान्ससोबत उभा आहे.’

नीस शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. नीसच्या महापौरांनी ट्विट करत हा हल्ला नोट्रे डेम चर्चजवळ करण्यात आल्याचं सांगितलं. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू आणि काही लोक जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

मागील 2 महिन्यातील अशा प्रकारच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सॅम्युअल पॅटी नावाच्या एका शिक्षकाची शिर कलम करण्यात आलं होतं. पॅटी यांना त्यांच्या शाळेतील एका 18 वर्षीय चेचेन व्यक्तीने मारलं. पॅटी यांनी आपल्या वर्गातील मुलांना पैगंबर मुहम्मद यांच्यावर शार्ली हेब्दो मासिकाने छापलेलं कार्टून दाखवलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला.

अनेक मुस्लीम देशांकडून फ्रान्सला विरोध

फ्रान्स शिक्षक पॅटी यांच्या हत्येतून सावरत असतानाच नीस शहरातील नोट्रे डॅम चर्चबाहेर एक हल्लेखोराने एका महिलेचं शिर कलम करत हत्या केली. तसेच इतर दोन जणांना चाकूने भोसकून खून केला. या हल्ल्यानंतर तात्काळ चर्चच्या बाहेर सुरक्षा कडं तयार करण्यात आलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांच्यावर मुस्लीम राष्ट्रांकडून टीका होत असतानाच हा हल्ला झाला आहे.

हेही वाचा :

भेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण काय?

Rafale | भारतीय वायुदलाचे सामर्थ्य वाढणार, फ्रान्सहून पाच राफेल विमाने रवाना

Rafale induction | राफेलचा राज्याभिषेक; राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत राफेल विमानांचे पूजन

Three killed outside church in nice France on maximum alert PM Modi Support Macron

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.