ट्विटर डील स्थगित, एलन मस्कची मोठी घोषणा, फेक अकाऊंटवर निर्णय होणार

ट्विटर डील स्थगित, एलन मस्कची मोठी घोषणा, फेक अकाऊंटवर निर्णय होणार
एलन मस्क
Image Credit source: tv9

एलन मस्क यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या शेअर्समध्ये 20% घसरण झाली आहे. ट्विटरने या प्रकरणावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 13, 2022 | 4:56 PM

नवी दिल्ली : जगभर चर्चेत असलेली ट्विटर डील (Twitter Deal) स्थगित करण्यात आलीय. ट्विटरला विकत घेणारे जगातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Alan Musk) यांनी ट्विटरवरच तशी घोषणा केलीय. फेक अकाऊंट, फेक फॉलोअर्सवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. ट्विटरच्या डीलचं  भविष्यात काय होणार याबाबत मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. पण सध्या तरी ट्विटर डीलला ब्रेक लागल्याचे सांगितलं आहे. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट (Microblogging Website) ‘ट्विटर’ प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क विकत घेणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत होती. पण यामध्ये आता एक नवे वळण आले असून एलॉन मस्क यांनी ही डील तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे आज घोषित केले. तसेच त्यांनी ही माहिती ट्विटर करतच दिली आहे. मस्क यांनी सांगितलं की, “ट्विटरवर सध्या 5 टक्क्यांहून कमी स्पॅम आणि बनावट अकाऊंट्स आहेत, या अकाऊंट्सची माहिती अद्याप ट्विटरकडून आपल्या टीमला मिळालेली नाही. त्यामुळे ट्विटर खरेदीची डील तात्पुरती स्थगित करण्यात येत आहे. यानंतर आधीच अडचणीत आलेल्या शेअर मार्केटवरही परिणाम दिसून आला असून शेअर्स मार्केटमध्ये 17 टक्क्यांची घसरण झाली आहे.

४४ अब्ज डॉलर्सचा हा करार

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर $44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली. या वर्षी हा करार पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर ट्विटरवर इलॉनचे पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे ते थांबवण्यात आले आहे.

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले

एलन मस्क यांनी म्हटले आहे की, स्पॅम आणि बनावट खात्यांच्या मुद्द्यावर हा करार थांबला आहे. इलॉन मस्क यांनी ट्विट केले, “ट्विटर करार तात्पुरता थांबवण्यात आला आहे, कारण स्पॅम किंवा खोट्या खात्यांची संख्या, जे वापरकर्त्यांपैकी 5% पेक्षा कमी असले पाहिजेत, ते अद्याप सापडलेले नाहीत.”

ट्विटरच्या शेअर्समध्ये 20% घसरण

एलन मस्क यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या शेअर्समध्ये 20% घसरण झाली आहे. ट्विटरने या प्रकरणावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कंपनीने महिन्याच्या सुरुवातीला गणना केली होती की पहिल्या तिमाहीत कमाई केलेल्या सक्रिय वापरकर्त्यांपैकी 5% पेक्षा कमी खोट्या किंवा स्पॅम खाती आहेत.

तसेच कंपनीने हे ही म्हटले आहे की, जो पर्यंत मस्क ही डील करत नाहीत तोपर्यंत कंपनीला अनेक संकंटाचा सामाना हा करावा लागेल. तसेच तर तोपर्यंत गुंतवणूकदार ही यात गुंतवणूक करतील की नाही हे ही माहीत नसल्याचे कंपनीने ही म्हटले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें