Indian Muslim: भारत-पाकच्या मुस्लिमांना अरब लोक या नावाने ओळखतात, 99 टक्के लोकांना वाचून धक्का बसणार
Indian-Pakistani Muslim: विविध देशातील मुस्लिमांना अरब देशांमध्ये, आखाती देशांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. खासकरून जेव्हा भारत आणि पाकिस्तानातील मुस्लिम जेव्हा अरब देशात जातात तेव्हा त्याला या खास नावाने ओळखतात. हे नाव वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Arab Countries: जगभरातील अनेक देशात मुस्लिम राहतात. पण विविध देशातील मुस्लिमांना अरब देशांतील लोक वेगवेगळ्या नावाने ओळखतात. खासकरून जेव्हा भारत आणि पाकिस्तानातून जेव्हा मुस्लिम अरब देशात जातात. तेव्हा त्यांना मुसलमान या नावाने नाही तर वेगळ्या नावाने ओळखले जातात. हे नाव धार्मिक नाही तर भौगोलिकतेवरून दिल्या जाते हे वाचून तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसेल.चला तर आखाती देशातील मुस्लिम बांधव भारतीय आणि पाकिस्तानी मुस्लिमांना कोणत्या नावाने ओळखतात ते माहिती करून घेऊयात.
भारत-पाक मुस्लिमांना कोणत्या नावाने ओळखतात?
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांनी एका पॉडकास्टमध्ये याविषयीवर मन मोकळं केलं. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की अरब देशात भारतीय मुस्लिमांना कोणत्या नावाने ओळखले जाते अथवा हाक मारली जाते. तेव्हा त्यांनी भारतीय मुस्लिमांना हिंदी, हिंदवी अथवा जमात ए हिंद या नावाने ओळखले जात असल्याची माहिती दिली. याचा अर्थ भारतीय अथवा पाकिस्तानी मुस्लिमांची ओळख ही धार्मिक आधारावर करण्यात येत नाही तर भारतीय मुस्लिमांची ओळख ही भौगोलिक आणि सांस्कृतिक आधारावर करण्यात येते. म्हणजे आखाती देशात भारतीय मुस्लिमांना देशाच्या नावावरून ओळखले जाते. इतकेच नाही तर पाकिस्तानी मुस्लिमांना सुद्धा हिंद, हिंदवी अशी ओळख असल्याचे समोर येत आहे.
हिंदी, जमात ए हिंद म्हणण्याचे कारण काय?
डॉ. उमर अहमद इलियासी यांच्यानुसार, भारतातील मुस्लिमांना जगभरात हिंदुस्थानी मुसलमान या नावानेच ओळखले जाते. त्यामुळे अरब देशातील लोक पण भारतातील मुस्लिमांना हिंदी, हिंदवी अथवा जमात ए हिंद असे म्हटले जाते. येथे हिंद या शब्दाचा अर्थ हिंदुस्थान असा आहे. एखाद्या धर्माचा नाही.विशेष म्हणजे सांस्कृतिक, भौगोलिक ओळख अत्यंत जुनी आहे. जेव्हा हा धर्म जगभरात पसरलेला नव्हता. तेव्हापासून ही ओळख कायम मानल्या जाते.
भारत आणि पाकमध्ये किती मुस्लिम?
भारत हा हिंदूबहुल देश आहे. पण येथे मुस्लिमांची संख्या अधिक आहे. भारतात जवळपास 17.22 कोटी मुस्लिम राहतात. देशाच्या एकूण लोकसंख्यापैकी मुसलमानांचा वाटा जवळपास 14.2 टक्के आहे. भारत मुस्लिम लोकसंख्येत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर पाकिस्तानमध्ये जवळपास 22 कोटी मुस्लिम राहतात. दोन्ही देशात सुन्नी मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. तर शिया या लोकसंख्येत अल्पसंख्याक मानले जातात. पण या सर्व मुसलमानांना हिंद, हिंदी, हिंदवी या नावाने ओळखले जातात.
