AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? फक्त 2 मिनिटांत ‘असं’ चेक करा आणि सुरक्षित राहा!

आधार कार्ड नेहमी वापरतो व ते आपल्याकडेच असतं म्हणून सुरक्षित आहे असं न समजता, आपण स्वतः सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. एकदा usage history तपासा आणि खात्री करा तुमचं ओळखीचं हे महत्त्वाचं शस्त्र कुणाच्या चुकीच्या हातात तर नाही ना?

खरंच तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? फक्त 2 मिनिटांत 'असं' चेक करा आणि सुरक्षित राहा!
Aadhaar authentication
| Edited By: | Updated on: May 16, 2025 | 12:45 AM
Share

आज आधार कार्ड आपल्यासाठी केवळ ओळखीचं दस्तऐवज राहिलेलं नाही, तर आर्थिक व्यवहार, सरकारी योजनांचा लाभ, मोबाईल नंबर लिंक करणं, बँकिंग व्यवहार यांसारख्या शेकडो कामांमध्ये त्याचा वापर अनिवार्य झाला आहे. पण, जिथे सोय वाढते, तिथे धोकेही वाढतात

कधी वाटलं आहे का, तुमच्या नावावर कुणीतरी कुठे तरी KYC केली असेल? किंवा आधार नंबरचा वापर करून कोणीतरी दुसरं काहीतरी काम केलं असेल? हे सगळं तुमच्या नकळत घडत असलं, तर?

UIDAI नेच दिली आहे ‘ही’ सोपी ऑनलाइन सुविधा!

UIDAI चं अधिकृत myAadhaar पोर्टल आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या आधार वापराचा संपूर्ण इतिहास (Usage History) तपासण्याची सोय देतं. म्हणजेच, तुमचं आधार कार्ड कधी, कुठे, कोणत्या संस्थेकडून वापरलं गेलं – हे सगळं तुम्हाला पाहता येतं.

असे करा तुमच्या Aadhaar Usage History ची तपासणी

1. https://myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

2. तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि कॅप्चा टाका. मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.

3. लॉगिन केल्यानंतर “Authentication History” या पर्यायावर क्लिक करा.

4. कोणत्या तारखेपासून तपासायचं आहे ते निवडा आणि “Submit” दाबा.

5. तुम्हाला यादी मिळेल की आधारचा वापर कधी, कुठे आणि कोणत्या प्रकारच्या प्रमाणीकरणासाठी झाला आहे.

संशयास्पद आढळलं, तर काय कराल?

तुम्हाला काही व्यवहार तुमच्या माहितीतले वाटत नसतील, किंवा पूर्ण अनोळखी वाटत असतील, तर तातडीनं UIDAI शी संपर्क करा:

1. हेल्पलाइन नंबर: 1947

2. ईमेल: help@uidai.gov.in

आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अजून एक उपयुक्त पर्याय म्हणजे ‘बायोमेट्रिक लॉक’. तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट आणि आयरिस डेटा तात्पुरते लॉक करू शकता, म्हणजे कुणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.