मुलांना डिजिटल जगात सुरक्षित ठेवण्यासाठी जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया मुलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या जगात अनेक धोकेही लपलेले आहेत. त्यामुळे पालकांनी फक्त मोबाईल हातात देऊन मोकळं न होता त्यांच्या ऑनलाईन सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणे गरजेच बनलं आहे.

डिजिटल युगात मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्म्सवर मुले सक्रिय असतात. ते इथे मित्रांशी संवाद साधतात, नवीन गोष्टी शिकतात, अनुभव शेअर करतात. मात्र सोशल मीडियाचे फायदे जितके आहेत, तितकेच त्यात जोखमी देखील आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकांनी ही काळाची गरज समजून मुलांच्या डिजिटल आयुष्यावर लक्ष ठेवणं अत्यावश्यक ठरतं.
मुलांनी कोणत्या अॅप्सचा वापर करावा, त्यांचे सोशल मीडिया खाते कोण बघू शकतं, याबाबत त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्ज योग्य रीतीने सेट करणे फार गरजेचे आहे. कोणत्याही पोस्ट्स, लोकेशन, फोटो ही माहिती अनोळखी लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी विश्वसनीय व्यक्तींनाच एक्सेस असावा, याची दक्षता घ्या. कारण अशा सुरक्षात्मक उपायांमुळे ऑनलाइन फसवणूक आणि अन्य धोक्यांपासून बचाव होऊ शकतो.
त्याचप्रमाणे पालकांनी मुलांशी संवाद साधत, प्रेमाने आणि समजूतदारपणाने त्यांच्या डिजिटल सवयींवर लक्ष ठेवायला हवे. त्यांना काय पाहायला आवडतं, कोणाशी ते संवाद साधतात, हे जाणून घेणं कठोर नियंत्रणासाठी नसून त्यांच्या सुरक्षिततेसाठी असावं. तुमचं विश्वासार्ह वर्तन त्यांच्यात विश्वास निर्माण करतं आणि ते मनमोकळेपणाने आपले अनुभव शेअर करू लागतात.
सोशल मीडियाच्या सतत वापरामुळे मुलांचा अभ्यास, झोप, व्यायाम आणि कौटुंबिक वेळ यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून त्यांना एक ठराविक वेळ द्या, जसे की दिवसातून एक तास सोशल मीडिया वापरू देणं, आणि उर्वरित वेळ खेळ, अभ्यास व घरच्यांबरोबर घालवायला प्रवृत्त करा. यामुळे डिजिटल आणि प्रत्यक्ष आयुष्यातील संतुलन राखता येईल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुलांना सायबर बुलिंग, फेक न्यूज, अज्ञातांकडून येणाऱ्या फ्रॉड कॉल्स वा मेसेजेस याबद्दल सतत जागरूक करा. त्यांना सांगा की, कोणतीही वैयक्तिक माहिती, फोटो, बँक डीटेल्स इत्यादी अनोळखी व्यक्तींना शेअर करणं किती धोकादायक ठरू शकतं.
पालकांनी त्यांच्या मुलांसाठी असा वेळापत्रक तयार करावा ज्यामध्ये अभ्यास, विश्रांती आणि डिजिटल वेळ यांचा समतोल राखला जाईल. यामुळे मुलांना वेळेचे महत्त्व समजेल आणि ते सोशल मीडियाचा योग्य आणि मर्यादित वापर करू लागतील. योग्य संवाद, विश्वास आणि मार्गदर्शन यामुळेच आपल्या मुलांचे डिजिटल भविष्य सुरक्षित राहील!
