पावसाळयात सतत सापांची भीती वाटते? हे स्वस्त उपाय करा, घराच्या आसपासही फिरकणार नाहीत !
10 cheap solutions to keep snakes away from home : पावसात साप बाहेर पडण्याची, घरात येण्याची लोकांना भीती वाटते. मात्र घरात किंवा आजूबाजूला साप यायला नको असतील तर घरच्या घरी करता येणारे, काही सोपे, स्व्स्त उपाय करून पहा. तुम्हाला कुठेही साप दिसला तर हे दहा स्वस्त साप प्रतिबंधक उपाय नक्कीच वापरून पहा. परत साप घराकडे फिरकणारही नाही.

10 cheap solutions to keep snakes away from home : पावसाळ्यात, आपल्या आसपास किंवा घरात साप दिसण्याची लोकांना भीती वाटते. घर असो की सोसायटीबाहेर, नाहीतर बागेत, रस्त्यांवर, नद्यांमध्ये, सगळीकडे साप दिसतात. आजकाल, सापांशी संबंधित अनेक बातम्या येतात. साप पाहून लोकांना भर पावसातही घाम फुटतो. पावसाळ्यात, सर्वत्र पाणी साचल्यामुळे, सापांच्या बिळांमध्येही पाणी भरते, ज्यामुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. काही साप खूप विषारी असतात. जर ते चावले तर मृत्यू देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत, या धोकादायक प्राण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही हे 10 स्वस्त उपाय वापरून पाहू शकता. त्याचा अवलंब केल्याने साप घराकडे फिरकणारही नाहीत.
हे स्वस्त उपाय करा, साप पळतील दूर !
1. पावसाळ्यात, साप बहुतेकदा कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणांच्या शोधात असतात. अशा परिस्थितीत ते घरात, अंगणात, बागेत शिरतात. झाडांवर चढतात. सापांना तुमच्या घरापासून, अंगणातून, बागेपासून दूर ठेवण्यासाठी, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा. घराबाहेर झुडपे, सुकी पाने, लाकडाचे तुकडे आणि कचरा जमा होऊ देऊ नका.
2. घराच्या आत किंवा बाहेर बाग असेल तर गवताची छाटणी करत राहा. यामुळे सापांना लपण्यासाठी जागा मिळणार नाही.
3. जर तुमच्या घराभोवती उंदीर फिरत असतील, तर ते सापांना घरी येण्याचे आमंत्रण देऊ शकतात. साप उंदीर खातात, म्हणून जर त्यांना कुठेही उंदीर दिसले तर ते नक्कीच त्या ठिकाणी येतील. घराच्या आत किंवा बाहेर उंदीर वाढू न देणे हे चांगलं.
4. तुमच्या घराच्या भिंती आणि फरशीमध्ये भेगा असतील तर त्या ताबडतोब भरा, अन्यथा लहान आणि मोठे साप चुपचाप आत येऊ शकतात. साप लहान भेगा आणि छिद्रांमधून आत येऊ शकतात, म्हणून त्या जागा त्या सिमेंटने बंद करा.
5. जर तुम्ही तळमजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर राहत असाल तर तुमच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवू नका, विशेषतः पावसाळ्यात. यामुळे साप तसेच इतर कीटक, डास, माश्या इत्यादी आत येण्यापासून रोखले जातील. तसेच, खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. व्हेंटिलेशन किंवा ड्रेनेज पाईप्सजवळ बारीक जाळी बसवणे खूप फायदेशीर आहे.
6. तुमच्या घराच्या आत आणि बाहेर नियमितपणे मीठ आणि फिनाईलचे द्रावण शिंपडा आणि त्याच पाण्याने घर स्वच्छ धुवा. फिनाईलचा वास तीव्र असतो, जो सापांना आवडत नाही. पाण्यात मीठ किंवा फिनाईल मिसळा आणि ते घराभोवती शिंपडा.
7. तुम्ही कारल्याची पाने बारीक वाटून पाण्यात मिसळू शकता किंवा लसणाचा रस पाण्यात मिसळून द्रावण तयार करू शकता. ते मिश्रण स्प्रे बाटलीत भरा आणि घराभोवती फवारणी करा. यामुळे साप दूर राहतात.
8. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडुलिंबाचे तेल किंवा मोहरीचे तेल देखील शिंपडू शकता. ते भिंतींच्या बाजूने आणि नाल्यांमध्ये ओतणे देखील चांगले आहे, त्यामुळे साप तुमच्या घरापासून दूरच राहतील.
9. जर तुमच्या घरात बाग असेल आणि तुम्ही कुंड्यांमध्ये अनेक रोपे लावली असतील, तर रात्री तिथे अंधार ठेवू नका. एक किंवा दोन बल्ब लावा, जेणेकरून तिथे नेहमीच प्रकाश राहील. कारण सापांना अंधाराची ठिकाणे आवडतात. मंद दिवे ठेवल्याने साप येण्याची शक्यता कमी होते.
10. पाळीव मांजरी, कोंबड्या,काही जातींचे कुत्रे सापांना घरात राहू देत नाहीत आणि त्यांच्या वासामुळेही साप दूर राहतात. तुम्ही तुमच्या घरात पाळीव प्राणी ठेवू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
