जगातला सर्वात मोठा साप आला समोर, विषाने हत्तीलाही टाकतो मारून!
साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, ज्याच्याविषयी प्रत्येकालाच उत्सुकता असते. सापाच्या काही जाती विषारी असतात. त्यामुळे काही लोक सापांना खूप घाबरतात. याच कारणामुळेक काही साप विषारी नसले तरी लोक त्यांना मारून टाकतात. जगभरात वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे साप पाहायला मिळतात. सध्या मात्र जगातल्या सर्वात लांब आणि सर्वात विषारी सापाची सगळीकडे चर्चा होत आहे. हा साप चक्क कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सापाला थेट सापांचा राजा म्हटले जाते.

Malaysian King Cobra : साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, ज्याच्याविषयी प्रत्येकालाच उत्सुकता असते. सापाच्या काही जाती विषारी असतात. त्यामुळे काही लोक सापांना खूप घाबरतात. याच कारणामुळेक काही साप विषारी नसले तरी लोक त्यांना मारून टाकतात. जगभरात वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे साप पाहायला मिळतात. सध्या मात्र जगातल्या सर्वात लांब आणि सर्वात विषारी सापाची सगळीकडे चर्चा होत आहे. हा साप चक्क कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सापाला थेट सापांचा राजा म्हटले जाते.
माणसांपेक्षाही लांब आहे मलेशियन किंग कोब्रा
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तब्बल 18 फूट लांब असलेला साप पाहायला मिळत आहे. एका माणसाने आपल्या दोन्ही हातांनी हा साप पकडला असून तो माणसापेक्षाही उंच दिसत आहे. याच सापाला सांपाचा राजा म्हटले जाते. या सापाचे नाव मलेशियन किंग कोबरा असे आहे. हा जिवंत साप कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सापांचा राजा म्हणून का ओळखले जाते?
हा साप काळ्या पिवळ्या रंगाचा दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचा समोरचा भागही तेवढाच गाबरवून टाकणारा वाटत आहे. हा मलेशियन किंग कोबरा साप फक्त त्याच्या लांबीमुळेच नव्हे तर त्याची बुद्धीमत्ता, त्याचं विष, शिकार करण्याची अनोखी पद्धत यामुळेही तो जगभरात प्रसिद्ध आहे. हा साप इतर लहान सापांनाही खाऊन टाकतो. त्यामुळेच याला सापांचा राजा असे म्हटले जाते.
This is a Malaysian King Cobra. The longest venomous snake on the planet. It is the longest of the different subspecies of King Cobra, as well. Adult males can possibly reach up to 17ft to 18ft (5m). pic.twitter.com/GpuztXp9LB
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 15, 2025
वृद्ध हत्तीचाही होऊ शकतो मृत्यू
सापांचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांनुसार मलेशियन किंग कोब्राचे विष एवढे विषारी असते की ज्यामुळे एका वृद्ध हत्तीचाही मृत्यू होऊ शकतो. हा साप शक्यतो माणसांवर हल्ला करत नाही. जेव्हा त्याला असुरक्षित वाटते तेव्हाच तो हल्ला करतो. याच कारणामुळे या सापाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.
