वादळी पावसासोबत गारा पडण्याचं कारण काय? ढगांमध्ये बर्फ कसा गोठतो? जाणून घ्या सर्वकाही
देशात मान्सूनचं आगमन झालं असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी अनेकांनी शेतिविषयक काम उरकून घेतली आहे. आता पावसाच्या आगमन त्याच्या सातत्याकडे लक्ष लागून आहे. कारण पाऊस व्यवस्थित पडला तरच शेतकऱ्यांच्या शेत पिक उगवेल. असं असताना उन्हाळ्यातील पावसासोबत गारा देखील पडतात. असं का होत असेल माहिती आहे. नसेल तर जाणून घ्या..

जून महिना उजाडला की सर्वाचं लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागून असतात. खासकरून बळीराजा पावसाच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहतो. कारण या पावसावरच शेतीचं पुढचं गणित अवलंबून असतं. पाऊस व्यवस्थित झाला तर पिक मोठ्या डौलाने उभं राहणार असा विश्वास असतो. पण या दरम्यान गारपीट झाली तर होत्याचं नव्हतं होतं. पेरणी केली असेल तर शेतकऱ्याची धाकधूक वाढते. तसेच उन्हाळी पाऊस फेब्रुवारी मार्चमध्येही होतो. यामुळे गारपीट होण्याची जास्त शक्यता आहे. अशा स्थितीत उभ्या पिकांचं नुकसान होतं. कापणी होण्याआधीच या गारपिटीमुळे फार आडवी होतात. त्यामुळे हातात पिक येण्याआधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. पण उन्हाळ्यात जेव्हा वादळी पाऊस पडतो तेव्हा गारपीट होते. वातावरणीय बदलामुळे जून-जुलै महिन्यातही उकडतं. मग प्रश्न असा पडतो की उन्हाळ्यातच गारपीट कशी काय? ही गारपीट नेमकी होते तरी कशी? अखेर ढगांमध्ये बर्फाचे गोळे कसे काय तयार होतात? पावसाच्या थेंबासोबत अनेकदा अचानक बर्फाचे छोटे तुकडे पडू लागतात किंवा अवकाशातून बर्फाचे छोटे गोळे पडू लागतात त्याला गारपीट असं म्हणतात. ...