ट्रेनमध्ये जनरल बोगी केवळ पुढे आणि मागे का असते ? मध्यभागी का नाही ? रेल्वेने दिले उत्तर
एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये सामान्य श्रेणीचे डबे ट्रेनच्या पाठी किंवा पुढे जोडलेले असतात. ट्रेनच्या मधल्या भागात जनरल डबे का लावले जात नाहीत. या मागच्या कारणाचा आपण धांडोळा घेऊयात ..

आपण सर्वांनी कधी ना कधी रेल्वेने प्रवास केलेला आहे. कधी आपल्या गावाला जाण्यासाठी तर कधी नोकरीसाठी वा अन्य कारणांसाठी रेल्वेचा प्रवास करावाच लागत असतो. रेल्वेच्या गाड्यामध्ये नेहमीच विविध दर्जाचे डबे जोडलेले असतात. जनरल, स्लीपर आणि एसी कोच जोडलेले असतात. परंतू तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की जनरल डबे नेहमी ट्रेनच्या मागे किंवा पुढे जोडलेले का असतात ?
ट्रेनच्या मागे आणि पुढेच का नेहमी जनरल डबे जोडलेले असतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये अनारक्षित / सामान्य श्रेणीचे डबे नेहमीच डब्याच्या पाठी किंवा पुढे जोडलेले असतात. ट्रेनच्या मधल्या भागात जनरल डबे का लावले जात नाहीत. या मागच्या कारणाचा आपण धांडोळा घेऊयात …
डबे किंवा बोगी यांच्या या रचनेमागे अनेक कारणे सांगितली जातात. एका तरुणाने ट्वीटरवर ( आताचे एक्स ) या संदर्भात नाराजी व्यक्त करीत हाच प्रश्न विचारला होता. २४ डब्यांच्या ट्रेनमध्ये जनरलचे दोन डबे का असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे हे जनरल डबे ट्रेनच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला का असतात ? या मागे ट्रेनचा अपघात झाला तर जनरल डब्यातून प्रवास करणारे गरीब आधी मरावे हा हेतू आहे का ? असा संतप्त सवाल या प्रवाशाने करीत रेल्वेला देखील टॅग केले.
या प्रश्नाला रेल्वेच्या अधिकारी संजय कुमार यांनी उत्तर दिले आहे. आपण चौकशी करणे योग्य आहे. परंतू त्यामागचा राग चांगला नाही. हे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी केले जाते. जनरल कोचमध्ये जास्त गर्दी असते. त्यामुळे जर जनरल डबे ट्रेनच्या मध्यभागी लावले असते तर मध्यभागी फलाटावर प्रवासी गर्दी करतील त्यामुळे इतर वर्गाच्या प्रवाशांना दोन्ही दिशांना जाता येणार नाही.
आपात्कालीन स्थिती मदतीसाठी
जनरल डब्याने पुढे आणि मागे जोडण्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे प्लॅटफॉर्मवरील गर्दीपासून वाचणे हा आहे. जनरल डबे दोन्ही दिशांना लावले तर गर्दी विभागली जाईल, काही जण पुढे जातील तर काही जण मागे जातील. हे रेल्वे अधिकाऱ्यांना आपात्कालिन स्थिती आणि दुर्घटनेच्या वेळी मदत पोहचविण्यासाठी आणि खराब स्थितीत मदत करण्यासाठी देखील सोयीचे आहे.
