Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पापणी का फडफडते ? या आजारांचे संकेत तर नाहीत ना?, खरे कारण जाणून बसेल धक्का

डोळ्याची पापणी फडफडणे हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. जो कधी ना कधी सर्वांनाच होतो. जेव्हा आपल्या पापण्यांचे स्नायू अनियंत्रित पद्धतीने अखडतात, तेव्हा पापणी फडफडणे सारखी सिच्युएशन तयार होते.

पापणी का फडफडते ? या आजारांचे संकेत तर नाहीत ना?, खरे कारण जाणून बसेल धक्का
Follow us
| Updated on: Feb 06, 2025 | 9:30 PM

माजो लवताय्‌ डावा डोळा, जाइजुईचो गजरो माळता, रतनअबोली केसान्‌ फुलता, काय शकुन, शकुन गो सांगताय्‌ माका? बाय, माजो लवताय्‌ डावा डोळा ! हे गाण तु्म्ही अनेकदा ऐकले असेल या गाण्यात डाव्या डोळ्याची पापणी फडफड करीत असेल तर काही तरी घडणार आहे याचे संकेत आहे असे गाण्याच्या कडव्याची शेवटची ओळ सांगत आहे. ती म्हणजे..’काय शकुन, शकुन गो, सांगताय्‌ माका? माजो लवताय डावा डोळा’ असे उत्तर दिलेले आहे. परंतू वैज्ञानिक भाषेत पापणी का फडफडत असते ? त्यामागे शरीरात काय रासायनिक क्रिया घडत असतात ते पाहूयात….

अनेकदा आपली पापणी फडफडत असते. त्यावेळी अनेकजण घरगुती उपाय करतात. अनेकजण पापणी फडफडत असेल तर काही तरी शुभ किंवा अशुभ बातमी कळणार असे म्हटले जात असते. काही जण तर डॉक्टरांना देखील जाऊन विचारतात. परंतू घरातील आजी- आजोबा घरगुती उपाय सांगत असतात. ते आजमावून आपणही पाहीले असतील आता डॉक्टर काय म्हणतात ते पाहूयात…

डोळ्याची पापणी फडफडणे ही सर्वसाधारणपणे ही सामान्य क्रिया आहे. यात गंभीर आजार वगैरे काही नसते. आणि काही वेळाने आपोआप पापणी फडफडणे बंद देखील होते. परंतू जर ही समस्या खूपच वेळ येत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायलाच हवी असे तज्ज्ञ डॉक्टर्सचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

तणावाच्या परिणामाने

डोळ्यांची पापणी फडफडणे हे तणाव आणि चिंतेमुळे देखील होऊ शकते. जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या खूपच थकलेलो असतो. तेव्हा अत्यंतिक तणावाचा सामना करीत असतो. तेव्हा आपल्या शरीरावर काही प्रतिक्रीया होतात. ज्यात डोळ्यांची पापणी फडफडणे देखील सामील आहे. स्नायूंच्या अनियमित आकुंचन पावल्याने देखील हे होते. जेव्हा अपुरी झोप होते तेव्हा देखील असा प्रकार होतो. जेव्हा आपण नीट झोपत नाही तेव्हा स्नायू काम करीत नाहीत आणि डोळ्यांची पापणी फडफडू लागते.

जादा कॅफीनचे सेवन

काही वेळा डोळ्यांची फडफडणे जास्त कॅफीन सेवन केल्याने देखील होते. जादा कॅफीन घेतल्याने नर्व्हस सिस्टीम स्टिम्युलेट करू शकते. त्यामुळे पापण्या फडफडू शकतात. डोळ्यांतील ड्रायनेस देखील डोळ्यांच्या पापण्या फडफडण्यासाठी जबाबदार असते. आपल्या डोळ्यातील पाणी कमी होते तेव्हा स्नायू आंकुचन होऊ लागतात. त्याने देखील पापण्या फडफडू लागतात. ज्यावेळी खूप तास कॉम्प्युटर पाहणे होते.त्यावेळी असे होऊ शकते. त्यामुळे अशा स्थितीत आर्टीफिशियल टीयर ड्रॉपचा वापर करण्याची वेळ येऊ शकते.

पोषक तत्वांची कमतरता

शरीरात जर पोषक तत्वाची कमरता असेल तरी हे घडू शकते. मॅग्नेशियम, पॉटेशियम आणि व्हिटामिन्स बी-१२ च्या कमतरतेने पेशींचे कार्य प्रभावित होऊ शकते. आणि डोळ्याची पापणी फडफडू शकते. जर लागोपाठ पापणी फडफडू लागली तर ती दुखू शकते, सूज येऊ शकते. त्यावेळी ही समस्या मज्जापेशींशी निगडीत असू शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता.

'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन.
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं.
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप.
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.