पार्क केलेल्या वाहनाचा फोटो काढणे का गरजेचे ? अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
शहरात वाहन पार्क करताना काळजीपूर्वक पार्किंग करावे लागते. अन्यथा आपल्या दंड भरावा लागू शकतो. तसेच गाडी पार्क करताना तिचा आपल्या मोबाईलने फोटो काढल्यास आपल्या जवळ एक पुरावा राहातो.

Car parking tips: नेहमी लोक आपली कार पार्क केल्यानंतर त्याचा फोटो काढत नाहीत. परंतू हे छोटेसे पाऊल तुम्हाला अनेक अडचणीतून वाचवू शकते. अनेक बिकट परिस्थितीत हा फोटो कामी येऊ शकतो. मग रेल्वे स्थानक, शॉपिंग मॉल अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी केलेली पार्किंग असो अशा प्रकारे पार्किंग केलेल्या आपल्या वाहनाचा फोटो काढला तर काय फायदा होतो ते पाहूयात…
वाहनाचे लोकेशन लक्षात ठेवण्यास मदत
मोठ्या पार्किंग एरियात वाहन उभे केल्यानंतर त्याला शोधण्यात बरेचदा अडचण येते, खासकरून रेल्वे स्थानक वा विमानतळ अशा जागी पार्किंग एरिया मोठा असल्याने काम झाल्यानंतर परत आल्यावर वाहनाला शोधणे कठीण जाते. जर आपल्या पार्किंग स्थळाचा फोटो आपण घेतला असला तर त्यात आजूबाजूच्या ओळखीच्या खुणा, पोल नंबर,दुकाने दिसत असेल तर वाहन शोधण्यास सोपे जाते.
चोरी वा नुकसान झाल्यावर पुरावा म्हणून कामी येते
जर आपल्या गाडीला काही नुकसान झाले तर उपयोगी येते. जसे चोरी, स्क्रॅच, टायर पंचरचे कोणतेही नुकसान झाले, तर पार्किंग स्थळावर हा मोबाईलवरुन काढलेला फोटो कामी येऊ शकतो. हा फोटो पोलिस तक्रार करणे, इंश्योरन्स क्लेम करणे वा पार्किंग अथोरिटीला तक्रार करताना मदतीला येते.
वेळ आणि ठिकाण रेकॉर्ड करण्यासाठी
बहुतांश स्मार्टफोन कॅमेरे फोटो काढताना त्याचा वेळ आणि तारीख सेव्ह करत असतात.जर काही कारणाने पार्किंगच्या वेळेवरुन वाद झाला, किंवा चुकीचे टोइंग चालान कापले,तर आपण फोटोद्वारे सिद्ध करु शकतो की आपले वाहन अमूक वेळी पार्क केले हे सिद्ध करता येते.
चुकीचे टोईंग वा चालानपासून सुटका
अनेक वेळा पार्किंग अधिकारी चुकीने चुकिच्या जागी उभ्या असल्याचा आरोप करीत कारला टो केले किंवा चालान कापले तर अशा वेळी तुमच्याकडचा पार्किंग स्थळाचा फोटो कामी येतो. ज्यात वाहन योग्य जागी पार्क केल्याचा फोटो तुमच्याकडे असतो. तुमच्या बचावाला हे कामी येऊ शकते.आणि तुम्हाला अनावश्यक दंडापासून वाचवू शकते.
