ATM उघड्यावर असलं तरी लुटणं इतकं सोपं नाही, कारण हे स्मार्ट सिक्योरिटी लेयर्स
आपल्या दैनंदिन गरजांसाठी ATM हे सहज उपलब्ध असलेलं साधन आहे.. पण अनेकदा मनात प्रश्न येतो, इतक्या मोकळ्या जागांमध्ये ठेवलेली ही ‘रोख भरलेली मशीन’ इतकी सुरक्षित कशी? चला तर मग जाणून घेऊया, अशा कोणत्या स्मार्ट सुरक्षा यंत्रणा ATM मशीनला लावल्या आहेत, ज्या मशीनला लुटणं अशक्य बनवतात.

आपण रोज रस्त्यांवर, दुकानांमध्ये, पार्किंगमध्ये किंवा बाजारपेठेत ATM मशीन पाहतो. कुठेही उघड्यावर ठेवलेली ही मशीन सहज पैसे काढण्याची सुविधा देते. पण अनेकांच्या मनात प्रश्न येतो की इतकी महत्त्वाची आणि पैशांनी भरलेली मशीन इतक्या बेधडक पद्धतीने ठेवली जाते तरीही ती सुरक्षित कशी असते? कोणीही ती फोडून पैसे का नेत नाही?
यामागचं कारण म्हणजे ही मशीन फक्त लोखंडी बॉक्स नसून, ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध लेयर्सनी सुरक्षित ठेवली जाते. चला, जाणून घेऊया ATM मशीन कशी सुरक्षित असते.
ATM मशीन अतिशय जाड आणि मजबूत धातूंपासून बनवली जाते. हातोडा, कटर किंवा ड्रिलसारख्या साधनांनी ती फोडणं खूप कठीण असतं आणि मोठा आवाज होतो, त्यामुळे आजूबाजूचं लक्ष वेधलं जातं.
अलार्म सिस्टीम
जर कोणी मशीन तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्यात बसवलेली अलार्म सिस्टीम जोरात वाजते. हे अलार्म थेट जवळच्या पोलिस स्टेशन किंवा सुरक्षा कंपन्यांशी जोडलेले असतात, जे लगेच प्रतिसाद देतात.
GPS ट्रॅकिंग सिस्टम
काही ATM मध्ये रोख रकमेच्या बॉक्समध्ये गुप्त GPS डिव्हाइस असते. जर कोणी पैसे घेऊन पळालाच, तरी पोलिस त्याच्या अचूक लोकेशनवर पोहोचू शकतात.
डाई पॅक्स
कॅश बॉक्समध्ये खास रंगीत डाई पॅक्स ठेवलेले असतात. जर चोरीचा प्रयत्न झाला तर हे पॅक्स फुटतात आणि पैसे कायमस्वरूपी रंगवले जातात. असे रंगीत पैसे कोठेही स्वीकारले जात नाहीत, त्यामुळे चोरी केलेलं रोख देखील वाया जातं.
कॅमेरा मॉनिटरिंग
ATM च्या आत आणि बाहेर कॅमेरे लावलेले असतात. चोर जरी चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या हालचाली, टूल्स कॅमेऱ्यात कैद होतात, जे पोलिसांना पुरावा देतात.
IoT आणि फायर/फ्लड सेन्सिंग
आजकाल काही ATM मध्ये IoT बेस्ड फायर आणि फ्लड सेन्सिंग सिस्टीम असते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचाही वेळीच आढावा घेता येतो.
बँकिंग सिस्टीम ट्रॅकिंग
ATM सेंट्रल बँकिंग सिस्टीमशी जोडलेली असते. जर वारंवार चुकीचा पिन टाकला गेला किंवा मशीनमध्ये छेडछाड झाली, तर ATM आपोआप लॉक होतो आणि अधिकृत व्यक्ती येईपर्यंत बंद राहतो.
व्हायब्रेशन सेन्सर्स
काही प्रगत ATM मध्ये व्हायब्रेशन सेन्सर्स असतात, जे ड्रिलिंग, हलवणे किंवा कंपन ओळखतात. जर असे प्रकार आढळले, तर लगेच अलार्म वाजतो आणि सिक्योरिटी टीमला सूचना मिळते.
इतर स्मार्ट फीचर्स
डेटा एन्क्रिप्शन, फेशियल रिकग्निशन, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, GSM बेस्ड सिक्योरिटी आणि स्किमिंग प्रिव्हेन्शनसारखी अनेक तंत्रे ATM ला अजून सुरक्षित करतात.
एकंदरीत पाहिलं तर ATM लुटणं एखाद्या चित्रपटात दाखवल्यासारखं सोपं नसतं. हे मशीन बुलेटप्रूफ मेटलपासून तयार असतं, अलार्म्स, कॅमेरे, सेन्सर्स, GPS आणि पेंट डिफेन्स यांसारख्या अनेक तंत्रज्ञानांनी सुरक्षित केलेले असते.