कापूस, सोयाबीनसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ५ नोव्हेंबरनंतर ‘कपडे फाडो’ आंदोलनाचा इशारा

केंद्र सरकारने येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत कृषीमालाचे भाव स्थिर केले नाही, तर केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर 'कपडे फाडो' आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

कापूस, सोयाबीनसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ५ नोव्हेंबरनंतर 'कपडे फाडो' आंदोलनाचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 4:49 PM

अकोला: अतिवृष्टीमुळं राज्यात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळं बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला परिसरात कापूस आणि सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी कृषीमंत्री केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाची माहिती सांगत आहेत, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana’s agitation warning for cotton and soyabeen)

शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी कृषी मालाचे भाव स्थिर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. केंद्र सरकारने येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत कृषीमालाचे भाव स्थिर केले नाही, तर केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर ‘कपडे फाडो’ आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

स्वाभिमानीची 19 वी ऊस परिषद ऑनलाईन होणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद (Sugarcane Conference) आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परिषदेच्या परवानगीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्‍हाधिकारी दौलत देसाई यांच्यात आज (30 ऑक्टोबर) चर्चा झाली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार ऊस परिषद आता 2 नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर होण्याऐवजी आता कल्पवृक्ष गार्डन हॉल येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या 2 नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या:

स्वाभिमानीची 19 वी ऊस परिषद ऑनलाईन होणार, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे कारखानदार, ऊसतोड कामगारांचे लक्ष

अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु, स्वाभिमानीचा इशारा

Swabhimani Shetkari Sanghatana’s agitation warning for cotton and soyabeen

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.