AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंतवणुकीसाठी काश्मीरचं मैदान मोकळं, भल्या मोठ्या घराची किंमत केवळ 9 लाख रुपये!

जम्मू काश्मीरमधील शालिमार, श्रीनगर यासारख्या ठिकाणाच्या 5400 चौरस फूट जमिनीच्या भूखंडाची किंमत 52 लाख 50 हजार रुपये आहे. तर 1000 चौरस फूट घरांची किंमत साधारण 9 लाख 73 हजार रुपयापर्यंत मिळू शकतात.

गुंतवणुकीसाठी काश्मीरचं मैदान मोकळं, भल्या मोठ्या घराची किंमत केवळ 9 लाख रुपये!
| Updated on: Aug 06, 2019 | 10:40 AM
Share

श्रीनगर : कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरचा (jammu and kashmir) विशेषाधिकारही काढून टाकण्यात आला आहेत. यामुळे आता सर्वांना मालमत्ता खरेदी-विक्रीचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे बिझनेसमन, रिअल इस्टेट यासारखे अनेकजण काश्मीरमध्ये घर खरेदी (Land Rates in jammu and kashmir) करण्याचा विचार करत आहे. दरम्यान विशेतज्ञांनी गेल्या काही वर्षातील प्रॉपर्टीच्या (Property Rate) किमतीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षात जम्मू काश्मीरमधील प्रॉपर्टीची किमती दिवसेंदिवस वाढत आहे.

काश्मीरमध्ये घर, फ्लॅट, विला, फार्म हाऊस आणि व्यावसायिक दुकाने यासारख्या गोष्टीची खरेदी करण्यासाठी अनेकांनी उत्सुकता दाखवली आहे. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये प्रत्येक वर्गासाठी घर उपलब्ध असल्याचेही बोललं जात आहे.

श्रीनगरच्या जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर 2019-20 या वर्षातील शहरातील प्लॉटची बाजार भावानुसार किंमतीचे पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार, श्रीनगरच्या जिल्ह्यातील विविध भागात बाजार भावानुसार प्रॉपर्टीच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. श्रीनगरमधील शालीमारमध्ये निवासी भूखंडाचा बाजारभाव प्रति कनाल 52 लाख 50 हजार रुपये आहे. तर व्यवसायिक भूखंडाची बाजारभावानुसार किंमत प्रति कनाल 97 लाख रुपये आहे. त्याशिवाय  श्रीनगरमधील ग्रामीण भागातील सैदपुरा या ठिकाणी निवासी भूखंडाची किंमत प्रति कनाल 15 लाख 75 हजार आहे. तर व्यावसायिक भूखंडाची किंमत ही प्रति कनाल 17 लाख 85 हजार रुपये आहे.

तसेच अनंतनागमध्ये 2018-19 शहरी भागातील घरांची किंमत बाजार भावानुसार देण्यात आली आहे. यात विविध कॉलनींच्या किंमत देण्यात आल्या आहे. अनंतनागमधील पहलगाम पालिकेच्या आजूबाजूच्या परिसरात निवासी भूखंडाची किंमत प्रति कनाल 81 लाख 20 हजार आहे. तर व्यावसायिक भूखंडाची किंमत 92 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासोबतच जम्मूमधील अखनूर भागातील ग्रामीण क्षेत्रात जमिनीच्या किंमतीबाबतही एक पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामीण भागात निवासी भूखंडाची किंमत प्रति कनाल 24 लाख 71 हजार रुपये आहे. तर व्यावसायिक भूखंडाची किंमत प्रति कनाल 36 लाख 85 हजार रुपये आहे. दरम्यान इतर जिल्ह्यांच्या भूखंडांच्या माहितीसाठी तुम्ही त्या त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरुन जाऊन किंमती बघू शकता.

विशेष म्हणजे या पत्रकात जम्मू काश्मीरमधील गेल्या अनेक वर्षातील जमिनीच्या किंमतींची तुलना केली आहे. श्रीनगरमध्ये जमिनीच्या किंमती 2018-19 च्या तुलनेत यंदा 5 टक्क्यांने वाढल्या आहेत. तर कुपवाडामधील पुलवामातील जमिनींच्या किंमती 7 टक्क्यांनी, तर अनंतनागमधील जमिनींच्या किंमती 6 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

कनाल म्हणजे काय?

जम्मू काश्मीरसह अन्य काही राज्यात जमिनीचे माप मोजण्यासाठी कनाल आणि मार्ला या दोन युनिटचा वापर केला जातो. म्हणजेच उदाहरणार्थ, 1 कनाल म्हणजे 510 चौरस मीटर किंवा 8 एकर. तसेच 1 कनाल म्हणजे 5400 चौरस फूट आणि 605 स्केवअर यार्ड्स असे असू शकते. तर जम्मू काश्मीरच्या जमिनीच्या मापानुसार 1 कनाल म्हणजे 20 मार्ला होतात.

यानुसार जम्मू काश्मीरमधील शालिमार, श्रीनगर यासारख्या ठिकाणाच्या 5400 चौरस फूट जमिनीच्या भूखंडाची किंमत 52 लाख 50 हजार रुपये आहे. तर 1000 चौरस फूट घरांची किंमत साधारण 9 लाख 73 हजार रुपयापर्यंत मिळू शकतात.

कलम 370 हटवणार

मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत जम्मू काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली. इतकंच नाही तर राज्याच्या पुनर्रचनेचाही प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. यानुसार लडाख हे जम्मू काश्मीरपासून वेगळं करण्याचा प्रस्ताव आहे. अमित शाह हे जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 35 A रद्द करतील असे तर्क होते, मात्र त्यापुढे जाऊन, ज्या कलमांतर्गत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे, ते कलम 370 हटवण्याचाच प्रस्ताव अमित शाहांनी ठेवला. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली.

जम्मू काश्मीरबाबतच्या 5 महत्वाच्या घटना

1) कलम 370 हटवल्याने विशेष अधिकार संपुष्टात

2) जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित राज्यांची निर्मिती

3) भारतीय संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू

4) जम्मू काश्मीरची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात

5) सर्वांना मालमत्ता खरेदी-विक्रीचा अधिकार

संबंधित बातम्या : 

Article 370 | मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात…

Article 370 | राष्ट्रपतींचा तो आदेश, ज्याने कलम 370 हटवलं!

Article 370 | जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याने काय होईल?  

Article 35 A | जम्मू काश्मीरमधील कलम 35 A हटवल्यास काय होईल?  

Jammu Kashmir LIVE : मास्टरस्ट्रोक! जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार : अमित शाह 

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....