BMW ची M5 Competition भारतात लाँच, किंमत तब्बल…

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार कंपन्यांपैकी एक असलेल्या BMW ने नवीन BMW M5 Competition कार भारतात लाँच केली आहे. ही कार 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग धरु शकते. स्टॅण्डर्ड M5 100 किमी प्रति तासाचा वेग धरण्यासाठी 3.9 सेकंदाचा वेळ घेते.

BMW ची M5 Competition भारतात लाँच, किंमत तब्बल...

मुंबई : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार कंपन्यांपैकी एक असलेल्या BMW ने नवीन BMW M5 Competition कार भारतात लाँच केली आहे. ही कार भारतात कंप्लीटली बिल्ट युनिट (CBU)म्हणून लाँच झाली आहे (BMW M5 Competition Launched In India). भारतात या कारची एक्स-शोरुम किंमत तब्बल 1.55 कोटी रुपये आहे. या कारमध्ये स्टॅण्डर्ड BMW 5 मध्ये असलेलं इंजिन वापरण्यात आलं आहे. या कारमध्ये 4.4 लीटर ट्वीन टर्बो V8 मोटार देण्यात आली आहे. हे मोटार 616 bhp पॉवर आणि 750Nm टॉर्क जनरेट करतं.

BMW M5 Competition मध्ये 8 स्पीड M स्टेपट्रॉनिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. ही कार 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग धरु शकते. स्टॅण्डर्ड M5 100 किमी प्रति तासाचा वेग धरण्यासाठी 3.9 सेकंदाचा वेळ घेते. M5 प्रमाणेच या कारमध्येही M xDrive ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टम देण्यात आला आहे. कारमध्ये DSC आणि xDrive मोड्स देण्यात आले आहेत. यामुळे ड्रायव्हरला 4WD, 4WD Sport आणि 2WD मोडमधून एक मोड निवडण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

M5 Competition दिसायला तिच्या स्टॅण्डर्ड व्हर्जन सारखीच आहे. या एडिशनमध्ये काही नवे फीचर्सही देण्यात आहेत. या व्हर्जनमध्ये रेडिएटर ग्रील, विंग मिरर, रिअर अप्रॉन, रिअर स्पॉयलर देण्यात आले आहेत. या कारचं रुफ हे लाईटवेट आहे, यासाठी हाय टेन्साईल कार्बन फायबर प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे.

स्टॅण्डर्ड व्हेरिएंटच्या तुलनेत महाग

BMW M5 Competition ही स्टॅण्डर्ड BMW M5 व्हेरिएंटच्या तुलनेत 10 लाख रुपयांनी महाग आहे. याची भारतातील किंमत 1.44 कोटी रुपये आहे. भारतात याची स्पर्धा Mercedes-AMG E 63S आणि Audi RS7 Performance शी असेल.

संबंधित बातम्या :

TaTa Tiago Wizz लिमिटेड एडिशन लाँच, किंमत फक्त…

मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त SUV कार S-Presso लाँच, किंमत फक्त…

मारुती सुझुकीच्या ‘या’ कारच्या किंमतीत दीड लाखांची कपात

गावागावात, शहरात पोहोचलेली टाटा सुमो आता खरेदी करता येणार नाही

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI