काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या 14 ठिकाणांवर सीबीआयचा छापा, 50 लाख रुपये जप्त

कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते डीके शिवकुमार यांच्या 14 ठिकाणांवर सीबीआयने छापे (DK Shivakumar CBI Raid) मारले आहेत. यावेळी 50 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या 14 ठिकाणांवर सीबीआयचा छापा, 50 लाख रुपये जप्त

बंगळुरु : कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते डीके शिवकुमार यांच्या 14 ठिकाणांवर सीबीआयने छापे (DK Shivakumar CBI Raid) मारले आहेत. या 14 ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये आतापर्यंत 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहेत. याचवेळी डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांच्या काही ठिकाणांवरदेखील छापे मारण्यात आले आहेत. (CBI seizes Rs 50 Lakhs cash during searches at the premises of DK Shivakumar)

बंगळुरुसह इतर काही ठिकाणांवर ही छापेमारी अजूनही सुरु आहे. यामध्ये कर्नाटकमधील 9, दिल्लीतील 4 आणि मुंबईतील एका ठिकाणाचा समावेश आहे. दिल्लीतल्या सफदरजंग परिसरातही डीके शिवकुमार यांचं घर आहे. तिथेदेखील छापा मारण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या केसनुसार उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीवर छापेमारी झाली आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांनी या घटनेचा निषेध केला असून पक्षाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. सिद्धारामय्या म्हणाले की, ‘भाजप नेहमीच सूडाचे राजकारण करत जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरुन भरकटविण्याचा प्रयत्न करते. डीके शिवकुमार यांच्या घरावर टाकण्यात आलेली धाड हा अशाच प्रकारचा प्रयत्न आहे.’

Published On - 12:14 pm, Mon, 5 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI