भारतातल्या तरुणांपुढे मोठं संकट, हळूहळू पोखरून टाकणाऱ्या रोगाने डोकं वर काढलं!
आपल्या अवतीभोवती असे काही आजार आहेत, ज्यांच्यावर उपचाराची पद्दत, औषधी अजूनही आपल्याला विकसित करता आलेली नाही. त्यामुळेच या आजारांपासून वाचण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत, असा सल्ला दिला जातो.

Corneal Blindness : वेगवेगळ्या आजारांपासून माणवाचा बचाव व्हावा यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र एक करून औषधं बानवत असतात. आतापर्यंत अनेक आजारांवर आपल्याला मात करता आलेली आहे. पण आपल्या अवतीभोवती असे काही आजार आहेत, ज्यांच्यावर उपचाराची पद्दत, औषधी अजूनही आपल्याला विकसित करता आलेली नाही. त्यामुळेच या आजारांपासून वाचण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत, असा सल्ला दिला जातो. दरम्यान, डोळ्यांचा असा एक आजार आहे ज्याचा तरुणांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
नेमका आजार काय आहे?
कॉर्नियल ब्लाईंडनेस हा आजार कधीकाळी फक्त जास्त वय झालेल्या व्यक्तींनाच होतो, असे कधीकाळी मानले जायचे. पण आता हा आजार तरुणांनाही होत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण देशात या आजाराने ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. कॉर्नियल ब्लाईंडनेस हा डोळ्यांचा आजार आहे. या आजाराने गंभीर स्वरुप धारण केले तर थेट अंधत्व येऊ शकते. या आजारात डोळ्यांचा भाग असलेल्या कॉर्नियावर परिणाम होतो. संसर्ग, ट्रॉमा, पोषणातील कमतरता यामुळे हा आजार होतो. कॉर्नियल ब्लाईंडनेस हा आजार आता भारतात अंधळेपणासाठी सर्वांत मोठं दुसरं कारण ठरला आहे. मात्र हजारो लोकांना हा आजार होत असल्याचे समोर आले आहे.
20 ते 25 हजार लोकांना होतो आजार
नुकतेच इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया तसेच कॅराटो रिफ्रँक्टिव सर्जन्स यांची दिल्लीत एक तीन दिवसीय परिषद झाली. या परिषेद कॉर्नियल ब्लाईंडनेस या आजाराचे गांभीर्य तसेच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेत दिलेल्या माहितीनुसार भारतात दरवर्षी वीस ते पंचवीस हजार लोकांना कॉर्नियल ब्लाईंडनेस हा आजार होतो.
बहुसंख्य रुग्ण हे 30 वर्षांच्या आतील
या आजाराबाबत एम्समधील प्राध्यापक राजेश सिन्हा यांनी सविस्तर सांगितले आहे. भारतात सध्या कॉर्नियल ब्लाईंडनेस या आजाराचे बरेच रुग्ण आढळत आहेत. यात बहुसंख्य रुग्ण हे 30 वर्षांच्या आतील आहेत. हा एक गंभीर आणि संवेदनशील बदल म्हणता येईल. तरुण आपले डोळे गमवून बसत आहेत, असं राजेश सिन्हा यांनी म्हटलंय.
दरम्यान, संसर्ग, जागरुकतेची कमतरता आणि जखमांवर वेळेवर उपचार न केल्याने हा आजार होऊ शकतो. अ जिवनसत्त्वाच्या मतरतेमुळेही हा आजार होत असल्याचे समोर आले आहे.
