AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोनाची लागण, 3 खासदारांचा मृत्यू

इराणमध्येही कोरोनानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. इराणच्या उपपंतप्रधानांपासून आरोग्यमंत्री आणि 25 खासदारही यापासून सुरक्षित राहू शकलेले नाहीत (Corona virus Infection in Iran).

इराणमध्ये उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोनाची लागण, 3 खासदारांचा मृत्यू
| Updated on: Mar 12, 2020 | 6:55 PM
Share

तेहरान : इराणमध्येही कोरोनानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. इराणच्या उपपंतप्रधानांपासून आरोग्यमंत्री आणि 25 खासदारही यापासून सुरक्षित राहू शकलेले नाहीत (Corona virus Infection in Iran). या सर्वांनाच कोरोनाची लागण झाली आहे. चीन, इटलीनंतर आता इराणमध्येही कोरोनाने गंभीर रुप धारण केलं आहे. यात इराणच्या 3 खासदारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनाही घडली आहे. याशिवाय ब्रिटनचे आरोग्यमंत्रीही कोरोनाचे शिकार झाले आहेत. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या जगभरातील देशांमध्ये इराणचा तिसरा लागतो आहे. चीन, इटलीनंतर इराणमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. याच इराणमधील उपआरोग्यमंत्री इराज हररिची यांना देखील कोरोना संसर्ग झाला. सर्वसामान्य लोकांमध्ये कोरोनाची भीती आहेच. मात्र, याहून भयानक म्हणजे इराणच्या 25 खासदारांनाही कोरोनाची लागण झाली. यातील 3 खासदारांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात इरणानी लॉमकर, फतेमेह रहबर आणि मोहम्मद मीर मोहम्मदी यांचा समावेश आहे.

जिथं आरोग्यमंत्री, उप आरोग्यमंत्री आणि खासदारांनाही कोरोनाची लागण होऊ शकते, त्या देशात कोरोनाचा फैलाव किती वेगानं होतोय हे अगदी स्पष्ट आहे. खासदारांचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं इराण सरकारही हादरलं आहे. इराणने आपल्या यंत्रणांना हायअलर्टवर ठेवलं आहे.

इराणमध्ये कोरोनाच्या भीतीने 70 हजार कैद्यांचीही सुटका

इराणमध्ये दर शुक्रवारी सार्वजनिक पद्धतीनं होणारी नमाज रद्द करण्यात आली आहे. 22 शहरांमधील नमाज पठण रद्द करण्यात आलं आहे. कैदेत असणाऱ्या 70 हजार कैद्यांचीही सुटका करण्यात आली आहे. याशिवाय बाहेर जाणाऱ्या अनेक फ्लाईट्स आणि बाहेरुन इराणमध्ये येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतानं देखील इराणमधून येणाऱ्या प्रवाशांचा व्हिजा रद्द केला आहे.

कोरोनाच्या अफवांमुळे इराणमध्ये 36 लोकांचा मृत्यू

कोरोनाच्या या थैमानातच इराणमध्ये अफवांनाही उधाण आलं आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये दारु प्यायल्यानं कोरोना होत नाही अशी अफवा पसरली. यानंतर तब्बल 36 लोकांचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर या व्हायरसपासून वाचण्यासाठी भलते सलते उपाय सुचवले जात आहेत. एकीकडे व्हायरसचा धोका आणि दुसरीकडे व्हायरल खोट्या मेसेजचा धोका अशा दुहेरी संकटात इराण सापडला आहे.

ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनाही कोरोनाचा संसर्ग, पंतप्रधानांचीही चाचणी होणार

ब्रिटनचे आरोग्यमंत्री नदीन डॉरिस देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले. नदीन डॉरिस यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद घेतलं आहे. इतर कोणालाही कोरोना होऊ नये म्हणून स्वतःला वेगळ्या खोलीत बंद केल्याचं डॉरिस यांनी सांगितलं. त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पण, मला माझ्यासोबत राहत असलेल्या माझ्या 84 वर्षांच्या आईची अधिक काळजी वाटते. तिची देखील टेस्ट करावी. सर्वांनी हात धुवावेत आणि सुरक्षित राहावे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसनं पीडित असलेल्या डोरिस या पहिल्या नेत्या आहेत. एक आरोग्यमंत्री असल्यानं त्या स्वतः देखील अनेकांच्या संपर्कात आल्या आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. डोरिस यांनी पंतप्रधान बोरिस जॉनसनसह मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी भेटी घेतलेल्या सर्व अधिकारी, नेते आणि पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची देखील वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी वैयक्तिक पातळीवर देखील काळजी घेणं महत्वाचं असल्याचं स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या:

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Corona : इटलीसाठी रविवार ठरला घातवार, चीनपेक्षा सहापट बळींची नोंद

कोरोनाचा कहर, न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित

Corona virus Infection in Iran

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.