Corona Vaccine Tracker : जानेवारी अखेरपर्यंत अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या यूएस ट्रायलचे रिझल्ट्स येणार

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी सगळेच देश लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत.

Corona Vaccine Tracker : जानेवारी अखेरपर्यंत अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या यूएस ट्रायलचे रिझल्ट्स येणार
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 8:18 AM

वॉशिंग्टन : भारतासह जगभरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत 9,533,471 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर आतापर्यंत 138,657 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 424,710 सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 8,970,104 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (CoronaVirus Vaccine Tracker live and latest updates : AstraZeneca oxford pfizer covaxin)

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार जगभरात आतापर्यंत 64,812,136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जगभरात 1,498,258 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी सगळेच देश लस (Corona Vaccine) निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. भारतातही अनेक कंपन्या या लसीच्या संशोधनात गुंतल्या आहेत. यामध्ये अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) ही कंपनी आघाडीवर आहे.

अॅस्ट्राझेनेका कंपनीने बनवलेल्या कोरोनावरील लसीच्या ट्रायलचे रिझल्ट्स पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत येतील, अशी माहिती तिथल्या हेल्थ ऑफिसर्सद्वारे देण्यात आली आहे. ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठासह हातमिळवणी करत ही लस तयार केली आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीकडून सुरुवातीला सांगितलं होतं की, ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये त्यांनी बनवलेल्या कोरोनावरील लसीचे क्लिनिकल परीक्षण करण्यात आले. त्यात त्यांना 70 टक्के यश मिळालं आहे.

फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK!

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये UK हा पहिला देश ठरला आहे, ज्याने कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. UK सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे UK मध्ये आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.

MHRA ला UK सरकारनं 1 जानेवारी पूर्वी विशेष नियमांद्वारे लसीला मंजुरी देण्यासाठी अधिकृतरित्या सांगितलं होतं. येत्या काही दिवसांत लसीचा पहिला टप्पा बाजारात येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. UK सरकारनं लसीचे 40 लाख डोस खरेदी केले आहेत, जे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात ९५ टक्के प्रभावशाली ठरले आहेत.

भारतात पंतप्रधान मोदींकडून लसीचा आढावा

भारतात अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्यात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आले होते. अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्रा झेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तरित्या कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. तर लसीच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं आतापासूनच मोठी तयारी सुरु केली आहे.

संबंधित बातम्या :

लस तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात, कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

CORONA UPDATE : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेले नवे दिशानिर्देश आजपासून लागू

(CoronaVirus Vaccine Tracker live and latest updates : AstraZeneca oxford pfizer covaxin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.