मुंबई महापालिकेचा कोविड सेंटर घोटाळा, राज्यपालांचे लोकायुक्तांना चौकशीचे निर्देश; सोमय्यांचा दावा

मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्यावरून भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्यातील ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेला घेरले आहे. (covid center scam, kirit somaiya allegations on bmc)

मुंबई महापालिकेचा कोविड सेंटर घोटाळा, राज्यपालांचे लोकायुक्तांना चौकशीचे निर्देश; सोमय्यांचा दावा
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 1:31 PM

मुंबई: मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्यावरून भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्यातील ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेला घेरले आहे. मुंबईतील कोविड सेंटरसाठीची जमीन ठाकरे सरकारने त्यांच्या मित्राकडून खरेदी केली. याप्रकरणाची मी राज्यपालांकडे तक्रार केली असून राज्यपालांनी लोकायुक्तांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. (covid center scam, kirit somaiya allegations on bmc)

किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी 12 हजार कोटींचा पाच हजार बेड्सचा कोविड सेंटरचा प्रकल्प आणला. त्यासाठी तीन हजार कोटींची जमीन ठाकरे सरकारने कौटुंबिक मित्राकडून घेतली. याबाबत मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. राज्यपालांनी आपल्या अधिकारांतर्गत लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असं सोमय्या म्हणाले. सोमय्या यांच्या या आरोपामुळे ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका अडचणीत सापडण्याची चिन्हे असल्याचं बोललं जात आहे.

सोमय्यांचे इतर आरोप

>> दोन कोटी 55 लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली. ती ठाकरे सरकार, मुंबई महापालिका 900 कोटीत घ्यायला निघाले. त्यासाठी 345 कोटी दिले. दहिसर भूखंडाचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहे. याबाबत मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

>> अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात 30 जमिनीचे व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या 40 जमीन व्यवहारांपैकी तब्बल 30 नाईक कुटुंबासोबत केले.

>> रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का? ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचं लिहीलं आहे. नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजलं पाहिजे.

संबंधित बातम्या:

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

हे तर चिखलातील कमळ, सोमय्यांच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे अप्रत्यक्ष उत्तर

(covid center scam, kirit somaiya allegations on bmc)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.