AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्या शिखंडी, तुम्ही कितीही डिस्टर्ब करा, आम्ही घाबरणार नाही : किशोरी पेडणेकर

जे काही बोलत आहात, ते लोकांसमोर आणा, नुसते भूंकून लोकांना हॅमर करु नका, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किरीट सोमय्या शिखंडी, तुम्ही कितीही डिस्टर्ब करा, आम्ही घाबरणार नाही : किशोरी पेडणेकर
| Updated on: Nov 13, 2020 | 1:18 PM
Share

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी फोर्जरी (खोट्या सह्या) केली, त्यांच्यावर कारवाई का नाही केली? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारल्यानंतर पेडणेकरांनी सडकून टीका केली आहे. किरीट सोमय्या हे शिखंडीचा रोल करत आहेत. फ्रॉड म्हणजे सोमय्या असा समानार्थी शब्द लोकांमध्ये प्रचलित झाला आहे, असा निशाणा पेडणेकरांनी साधला. (Kishori Pednekar answers Kirit Somaiya allegations about SRA scam and forgery)

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

“किरीट सोमय्या हे शिखंडीचा रोल करत आहेत. महाभारतात शिखंडी कौरवांच्या आडून वार करत होते. आता फ्रॉड हा शब्द बोलायचा नाही. फ्रॉड म्हणजे सोमय्या असा समानार्थी शब्द लोकांमध्ये प्रचलित झाला आहे.” असा घणाघात किशोरी पेडणेकरांनी केला.

“वारंवार तक्रारी करायच्या आणि श्वानासारखे आवाज काढून लोकांना डिस्टर्ब करायची त्यांना सवय आहे. आरोप बिनबुडाचे आहेत, हे आम्ही कायम सांगत आलोय. आम्ही म्हणतो चॅलेंज घ्या आणि सिद्ध करा. कायद्याची चौकट मोडल्याचं तुम्हाला वाटतं ना, मग कायद्याने आम्हाला शिक्षा देऊ देत, आम्ही भोगू पण सिद्ध करा. तुम्ही सारखे आरोप करणार, आणि आम्ही कामधंदे सोडून आम्ही असे नाही हे सांगत बसणार नाही” असेही पेडणेकर म्हणाल्या.

“किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत. साडी नेसायचे बाकी आहेत, ते पण आम्ही करु. मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, मी महापौर म्हणून चांगलं काम करत आहे, मंत्री महोदय काम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब करायचं. मी अख्ख्या भाजपला धरत नाही, किरीट सोमय्या हे शिखंडीचा रोल करत आहेत, ते त्याच लायकीचे आहेत” अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकरांनी केली.

सोमय्या काय म्हणाले?

“किशोरी पेडणेकर यांनी खोट्या सह्या केल्या, त्यांच्यावर कारवाई का नाही केली?  मी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईच्या महापौरांसंदर्भात पेपर काढतो आहे, पुरावे देत आहे. अनिल परब यांनी मध्यमवर्गीय लोकांची जमीन लाटली. यांच्यावर कारवाई का करत नाही? मुद्दा मी डायव्हर्ट करत नाही तर ते करत आहेत” असे किरीट सोमय्या म्हणाले.

पेडणेकरांचा राणे-दरेकरांवर निशाणा

नारायण राणे आणि प्रविण दरेकर यांनी स्वप्न पाहावं, ती पूर्ण होणार नाहीत, पण त्यांना स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला. महाराष्ट्रात सत्तापालट होण्याचा दावा करणाऱ्या राणे-दरेकरांना पेडणेकरांनी उत्तर दिलं.

ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा सर्व जण भांबावलेलो होतो. त्यावेळी मार्चमध्ये उद्धव ठाकरे यांनी पहिलं कोव्हिड सेंटर उभं केलं. त्यानंतर आम्ही हळूहळू कोव्हिड सेंटरमध्ये जात होतो, त्याची नोंद जागतिक संस्थांनी घेतली आणि मुंबईच्या महापौरांचा गौरव केला. हे यश माझं असलं तरी त्याला साथ मुंबईकरांची, मुख्यमंत्र्यांची होती, असंही पेडणेकर म्हणाल्या.

“कोरोनाला घाबरलं पाहिजे. कोरोना लस अंतिम टप्प्यात आहे. 2021 मध्ये लसीकरणाचा उदय होऊ शकतो. संपूर्ण देश सुरक्षित होवो. हा विषाणू लक्षणविरहित होऊन हळूहळू तीव्र होतो” असंही पेडणेकर म्हणाल्या. (Kishori Pednekar answers Kirit Somaiya allegations about SRA scam and forgery)

किरीट सोमय्यांची सरबत्ती

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबावर आरोपांचा धडाका लावला. ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांचे संबंध काय आहेत?, ठाकरे कुटुंब आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध काय आहेत? असे सवाल सोमय्या यांनी केले.

ठाकरे परिवाराने एकूण 40 जमिनींचे व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 जमिनींचे व्यवहार एकट्या अन्वय नाईकसोबत झाले आहेत. एका व्यक्तीशी जमिनीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार कसे काय झाले? असा सवाल सोमय्या यांनी केला. मी ठाकरे कुटुंबाला केवळ पाच प्रश्न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरं द्यावीत. महाराष्ट्रातील जनतेला या व्यवहारांची माहिती हवी आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल

(Kishori Pednekar answers Kirit Somaiya allegations about SRA scam and forgery)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.