AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हायरल ऑडिओ, सूनेबद्दल आक्षेपार्ह शब्द, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

eknath khadse : एकनाथ खडसे यांनी विजय चौधरींच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी चौधरींवर कारवाईची मागणी केली.

व्हायरल ऑडिओ, सूनेबद्दल आक्षेपार्ह शब्द, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jul 30, 2026 | 10:16 AM
Share

नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते विजय चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे समोर आलं आहे. यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपवर आमदार एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी ऑडिओ क्लिप ऐकली आहे. नवीन भाजप आणि जुनी भाजपमध्ये संस्कृतीचा फरक आहे. चौधरीसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा खराब होते. विजय चौधरी हे गेल्या 25-30 वर्षांत दारुच्या धंद्यात आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील दारूमाफीया म्हणून यांचं कुटुंब ओळखलं जातं. पैसे खर्च करावे, यासाठी त्यांना भाजपने सरचिटणीस केलं. अशा स्वरुपाचं वर्तवणूक, विचार करण्याची प्रवृत्ती आहे. एकाच घरात दोन पक्ष आहेत. नारायण राणे यांचं उदाहरण देता येईल. ते काँग्रेसमध्ये होते. त्यांचा एक मुलगा भाजपमध्ये आहे. तर एक शिवसेनेत आहे.

भाजप स्वतंत्र पक्ष आहे. राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. चौधरी यांनी असभ्य आणि अश्लाघ्य शब्द महिलांविषयी वापरले आहेत. ही भाजपची संस्कृती आहे का? महिलांबाबत घाणेरडे शब्द वापरले आहेत. माझ्या तोंडून शब्द येणार नाही, असे शब्द वापरले आहेत. रक्षा खडसे, कल्पना पांडे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे दिसून येते. त्यांनी राजीनामा दिला, हे बरे केले. असे अनेक लोक भाजपमध्ये आहेत. वर्षानुवर्षे काम केलेला माणूस आहे. पक्षाचा सरचिटणीस आहे. अनेक पदांवर काम केलं आहे. नवी माणसं न आवरणारी आहेत. यामुळे भाजपची प्रतिमा वाईट होत आहे. भाजपने त्यांची चिंता करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आताच्या भाजपवर टीका करताना खडसे म्हणाले की, ‘आताची भाजप आणि आधीची भाजपमध्ये फरक आहे. आताचे मंत्री ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. एखाद्या मंत्र्याने ताबडतोब थांबवलं असतं. पण मंत्र्याने थांबवलं नाही, शांतपणे ऐकून घेतलं. महिलांविषयी घाणेरडे शब्द वापरले, त्यांना रोखायला हवं होतं’. रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली, त्यावर बोलताना खडसे म्हणाले, ‘फक्त सूनेविषयी घाणेरडे शब्द वापरले नाहीत. तर नंदुरबारमधील स्थानिक महिलांसोबतही असभ्य वर्तन केलं आहे. मी ही क्लिप भाजपच्या वरिष्ठांकडे देणार आहे. माझेही भाजपच्या वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यांना ही बाब कळवणार आहे. अशी घटना घडत असेल, तर हे दुर्दैव आहे’.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय, त्यांनीच... दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग