भारताला दोष देताना पाकिस्तानची फसगत, पॉर्न स्टारचा फोटो काश्मीर पीडित म्हणून पोस्ट

पाकिस्तानने (Pakistan) जम्मू काश्मीरविषयी (Jammu Kashmir) असे अनेक दावे केले आहेत ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालावी लागली. मात्र, तरिही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.

भारताला दोष देताना पाकिस्तानची फसगत, पॉर्न स्टारचा फोटो काश्मीर पीडित म्हणून पोस्ट


नवी दिल्ली: पाकिस्तानने (Pakistan) जम्मू काश्मीरविषयी (Jammu Kashmir) असे अनेक दावे केले आहेत ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालावी लागली. मात्र, तरिही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित (Abdul Basit) यांनी काश्मीर प्रकरणात भारताला दोष देणारा दावा करताना चक्क पॉर्नस्टारचा (Porn Star Johnny Sins) फोटो रिट्विट केला. तसेच तो फोटो काश्मिरमधील पीडितेचा असल्याचा दावा केला.

पाकिस्तानी माजी उच्चायुक्तांच्या या रिट्विटनंतर ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. त्यांनी केलेल्या रिट्विटमध्ये म्हटले होते, “काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय सैन्याने केलेल्या पेलेटगनच्या हल्ल्यात युसुफ नावाच्या व्यक्तीची दृष्टी गेली आहे. त्याच्याविरोधात उभं राहा.”


अब्दुल बासित यांनी रिट्वीट केलेल्या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार नायला इनायत यांनी देखील बासित यांच्या ट्विटचे अनेक स्क्रिनशॉट पोस्ट केले आहेत. मात्र, बासित यांच्या खात्यावर संबंधित ट्विट दिसत नाहीत. त्यांनी आपले ते रिट्विट काढून टाकले आहे. नायला इनायत यांनी बासित यांनी रिट्विट केलेल्या अनेक ट्विटचे स्क्रिनशॉट पोस्ट केले आहेत. अमर नावाच्या व्यक्तीने याबाबत ट्विट केलं आहे.

पाकिस्तानच्या दाव्यामागील सत्य काय?

अब्दुल बासित यांनी रिट्विट केलेल्या फोटोत दिसणारी व्यक्ती पोर्न फिल्म स्टार जॉनी सिन्स (Porn Star Johnny Sins) आहे. तो रोग्याच्या वेशभूषेत पलंगावर झोपलेला आहे. त्यावर दुसरी महिला पोर्न स्टार त्याला पाहून रडण्याचा अभिनय करत आहे.

विशेष म्हणजे अशाच अन्य एका ट्विटमध्ये जॉनी सिन्ससाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या व्यक्तीला कर्कराग झाला असून त्याला आशिर्वाद द्या, दुर्लक्ष करू नका. तुमचं एक लाईक एक आशिर्वाद देईल, असं म्हटलं आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI