Fact Check | गांजा कायदेशीर झाल्याचं ऐकून खूश होण्याआधी ‘हे’ वाचा, संयुक्‍त राष्‍ट्राकडून स्पष्टीकरण

संयुक्‍त राष्‍ट्राने (United Nations) गांजाला आपल्या नार्कोटिक्‍स ड्रग्‍सच्या यादीतून हटवल्याचं बोललं जात आहे.

Fact Check | गांजा कायदेशीर झाल्याचं ऐकून खूश होण्याआधी 'हे' वाचा, संयुक्‍त राष्‍ट्राकडून स्पष्टीकरण

न्यू यॉर्क : मागील काही दिवसांपासून गांजा (Cannabis) ड्रग्‍सच्या यादीतून काढून टाकल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. संयुक्‍त राष्‍ट्राने (United Nations) गांजाला आपल्या नार्कोटिक्‍स ड्रग्‍सच्या यादीतून हटवल्याचं बोललं जात आहे. ही बातमी ऐकून अनेकांना आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर खूश होण्याआधी ही बातमी जरुर वाचा (Fact check cannabis is not legal misleading claims surfaces of UN decision).

संयुक्‍त राष्‍ट्राने स्वतः गांजाविषयी घेतलेल्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं आहे. संयुक्‍त राष्‍ट्रा स्‍पष्‍ट केलं की गांजावरील निर्बंध हटवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. केवळ संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने गांजाला सर्वात धोकादायक ड्रग्‍सच्या यादीतून हटवण्यासाठी मतदान केलं आहे. मात्र, 130 देशांमध्ये अजूनही गांजा बेकायदेशीर ड्रग्जच्या यादीत येतो. गांजा अजूनही नार्कोटिक्‍स ड्रग्‍सच्या यादीत आहे.

भारतासह 27 देशांचं गांजाला धोकादायक ड्रग्जच्या यादीतून हटवण्याच्या बाजूने मतदान

2 डिसेंबरला जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारशीवर यूएन कमिशन ऑन नार्कोटिक्‍स ड्रग्‍सने गांजाला (Cannbis) धोकादायक ड्रग्‍सच्या यादीतून हटवण्यासाठी मतदान केलं होतं. याआधी गांजाचा समावेश हेरोईनसारख्या इतर धोकादायक ड्रग्‍सच्या यादीत होता. जवळपास 59 वर्षांपासून यावर कठोर निर्बंध होते. मात्र, नुकतेच भारतासह 27 देशांकडून गांजाला धोकादायक ड्रग्जच्या यादीतून हटवण्याच्या बाजूने मतदान केलं होतं.

पाकिस्‍तान आणि चीनने याला विरोध केला होता. संयुक्त राष्ट्राने गांजाचा उपयोग औषधं तयार करण्याच्या उद्देशाने परवानगी मिळावी म्हणून यादीतून हटवण्याच्या बाजूने मतदान केलं होतं.

संयुक्त राष्ट्राने गांजाला धोकादायक ड्रग्जच्या यादीतून हटवलं असलं तरी त्यावरील निर्बंध संपलेले नाही. गांजाला केवळ शेड्यूल 4 च्या धोकादायक यादीतून काढून शेड्यूल 1 मध्ये टाकण्यात आलं आहे. त्यामुळे गांजाचा वापर अजूनही बेकायदेशीच आहे.

सोशल मीडियावर गांजाविषयी फेक न्‍यूज

संयुक्‍त राष्‍ट्राच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या (Fake News) पसरत असून त्यामुळे गांजाच्या वापराला कायदेशीर परवानगी मिळाल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर Cannabislegal हा हॅशटॅग देखील ट्रेंड झाला होता. अनेक लोकांनी यावर आनंदही व्यक्त केला आहे. यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्‍स आणि फेक न्‍यूज शेअर होत आहे. मात्र, संयुक्त राष्ट्राने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार गांजा अजूनही बेकायदेशीरच आहे.

हेही वाचा :

आत्ताच निश्चिंत होऊ नका, पुढील वर्षीची परिस्थिती यापेक्षाही खराब असू शकते, नोबेल विजेत्या WFP चा इशारा

जगात प्रत्येकी 130 पैकी एक महिला आधुनिक गुलामगिरीचा बळी, संयुक्त राष्ट्राचा धक्कादायक अहवाल

‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना अडवू नका’, संयुक्त राष्ट्राकडूनही मोदी सरकारला कानपिचक्या

Fact check cannabis is not legal misleading claims surfaces of UN decision

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI