WAR REVIEW : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा अॅक्शन पॅक्ड ‘वॉर’

'हेरगिरी' हा बॉलिवूडकरांचा आवडीचा विषय. अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी या विषयाचा चघळून चोथा केला. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदनं हाच विषय हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर' या सिनेमात हाच विषय हाताळला आहे (War Movie Review ). सिध्दार्थनं हृतिकसोबत 'बॅंग बॅंग' हा सिनेमाही हाच धागा पकडून बनवला होता. आता या सिनेमातही हेरगिरी या विषयावरचं सिध्दार्थनं आपलं कथानक गुंफलं. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, पण कमकुवत कथानकाने या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

WAR REVIEW : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा अॅक्शन पॅक्ड 'वॉर'
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 7:41 PM

मुंबई : ‘हेरगिरी’ हा बॉलिवूडकरांचा आवडीचा विषय. अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी या विषयाचा चघळून चोथा केला. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदनं हाच विषय हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या सिनेमात हाच विषय हाताळला आहे (War Movie Review ). सिध्दार्थनं हृतिकसोबत ‘बॅंग बॅंग’ हा सिनेमाही हाच धागा पकडून बनवला होता. आता या सिनेमातही हेरगिरी या विषयावरचं सिध्दार्थनं आपलं कथानक गुंफलं. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, पण कमकुवत कथानकाने या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

सिनेमात चित्तथरारक स्टंट्स आहेत, हृतिक-टायगरची जुगलबंदी आहे (Hritik Roshan and Tiger Shroff), चकाचक सुंदर परदेशातली लोकेशन्स आहेत, सिनेमात अनेक ट्विस्ट एन्ड टर्न्स आहेत, शॉकिंग (हास्यास्पद?) शेवट आहे. आता एवढं सगळं छान छान असून सुध्दा चित्रपटाचा आत्मा असणारी पटकथा तेवढी हरवली आहे. यशराज फिल्मसनं या सिनेमाचा शेवट आर्कटिक सर्कलमध्ये चित्रीत करण्याची परवानगी मिळवण्यासाठी चार महिने वाट बघितली (War Movie Review). या चार महिन्यात जर त्यांनी एकदा कथा वाचून त्यावर काम केलं असतं तर हा ‘वॉर’ चांगलाच रंगला असता.

चित्रपटाची कथा आहे कबीर (हृतिक रोशन) आणि खालिद (टायगर श्रॉफ)ची. कबीर भारताचा साहसी गुप्तहेर. देशासाठी प्राणाची आहुती द्यायचीही त्याची तयारी असते. खालिदसारख्या अनेक युवकांची कबीर प्रेरणा असतो. अनेकांना कबीरनं ट्रेनिंग दिलेली असते. अचानक कबीर देशाच्या विरोधात कारवाया करु लागतो. भारतातले काही प्रतिथयश मंडळी त्याच्या हिटलिस्टवर असतात. कबीरला थोपवण्याची जबाबदारी कर्नल (आशुतोष राणा) खालिदवर सोपवतो आणि मग सुरु होतो कबीर-खालिद अर्थात गुरु-शिष्यामधला ‘वॉर’. आता कबीर देशदोह्री का बनतो? खालिद कबीरला कसं थोपवतो? दोघांचं टार्गेट एकचं असतं का? दोघांमधला हा वॉर शेवटी कोण जिंकतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘वॉर’ बघावा लागेल.

दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदनं सिनेमात अॅक्शन वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलीये, पण जर त्याने कथेवर अजून मेहनत घेतली असती, तर सिनेमानंही वेगळी उंची गाठली असती. हृतिक आणि टायगरला एकत्र मोठ्या पडद्यावर बघणं त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदनं या जोडीला एकत्र आणण्य़ासाठी तेवढ्याच पॉवरफुल्ल कथेची निवड करणं गरजेचं होतं. ढिसाळ, कमकुवत कथानकाचा या सिनेमाला फटका बसण्याची शक्यता आहे. हृतिक आणि टायगरला समान स्क्रिनस्पेस देऊन अॅक्शनचा डोस देण्याच्या नादात दिग्दर्शकाला सिनेमात कथा नावाचा प्रकार असतो याचा विसर पडलेला दिसतोय. तसेच चित्रपटातील इतर पात्रांनाही तितकीच दुय्यम वागणूक देण्यात आलीये.

मध्यंतरापर्यंत सिनेमा चांगला जमून आलाये. पण मध्यंतरानंतर सिनेमात अनेक धक्कादायक वळणं देण्यात आले आहेत. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदनं अब्बास-मस्तान स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याला तो हवा तसा जमलेला नाही. सिनेमाचा शेवट धक्कादायक पण न पटणारा आहे. कथेत ट्विस्ट दाखवायचा म्हणून उगाच आपलं काहीपण दाखवता राव असं म्हंटल्य़ा शिवाय तुम्ही राहणार नाही. सिनेमातले काही प्रसंग अत्यंत बाळबोध वाटतात. आदित्य चोप्रा आणि सिध्दार्थ आनंदनं कथेवर मेहनत घेण्याची गरज होती. इस्लामिक आतंकवाद हा कथेचा केंद्रबिंदू आहे. चित्रपटातील लोकेशन्स याचा प्लस पाईंट आहे.

दिल्ली, केरळ, मॉल्टा, मोरक्को, ऑस्ट्रेलिया,आर्कटिक सर्कल, स्पेन येथे सी यंग ओ, परवेज शेख, फ्रांज आणि पॉल जेनिंग्जने सिनेमातील चित्तथरारक अॅक्शन दृश्य डिझाईन केली आहेत. हृतिक आणि टायगर हे दोघंही अॅक्शनचे मास्टर असल्यामुळे अॅक्शन दृश्य अफलातून झाली आहेत. ‘बॅंग बॅंग’ नंतर हृतिक सोबत दिग्दर्शक सिध्दार्थचा हा दुसरा सिनेमा. ‘बॅंग बॅंग’पेक्षा स्टाईलिश अंदाजात त्याने हृतिकला या सिनेमात सादर केलं. एवढं सोडलं, तर दिग्दर्शक म्हणून सिध्दार्थ कमकुवत ठरला. कथा कमकुवत ठरली असली तरी दिग्दर्शक म्हणून सिनेमा उचलण्यात सिध्दार्थ अपयशी ठरला. हृतिक रोशनच्या करिष्म्यामुळेच ‘वॉर’मध्ये खऱ्या अर्थाने जान आली.

हृतिक रोशनला बॉलिवूडचं ‘ग्रीक गॉड’ का म्हंटलं जातं हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं. कमकुवत कथानक असलेल्या संपूर्ण चित्रपटाचा डोलारा हृतिकने एकट्याच्या खांद्यावर उचलला. अॅक्शन असेल, डान्स असेल किंवा ड्रामा. सगळ्याच गोष्टीत हृतिकने बाजी मारली. टायगरनंही हृतिकच्या तोडीस तोड काम करण्याचा प्रयत्न केला, पण हृतिकच्या प्रभावामुळे तो दबला गेला. हृतिक-टायगरमधली डान्स-अॅक्शनची जुगलबंदी मात्र बघण्यासारखी आहे. वाणी कपूर सिनेमात का आहे हा प्रश्न मला सतावतो आहे. सिनेमात फक्त ग्लॅमरचा थोडा तडका हवा म्हणून तिला घेतलेलं दिसतं. तिचा रोल एक गाणं धरुन केवळ 10 मिनिटांचा आहे. तिच्या वाट्याला विशेष करण्यासारखं काही नाही. आशुतोष राणा, अनुप्रिया गोयंका, बालकलाकार दिशिता सेहगल छोट्या भूमिकांमध्येही लक्षात राहतात. विशाल-शेखरचं संगीत ठीकठाक आहे. ‘घुंघरु’ हे गाणं मस्त जमून आलंय, मात्र हे गाणं सिनेमात उगाच घुसवल्यासारखं वाटतं. ‘जय जय शिव शंकर’ या गाण्यात हृतिक-टायगरची डान्सची जुगलबंदी त्यांच्या चाहत्यांसाठी ट्रीट आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही उत्तम आहे.

एकूणच काय करोडो खर्च करुन भव्य काहीतरी करण्याच्या नादात आदित्य चोप्रा आणि सिध्दार्थ आनंदचं कथेकडे झालेलं दुर्लक्ष घातक ठरु शकतं. यशराजकडे हृतिक-टायगरच्या रुपात दोन हुकमाचे एक्के होते. जर कथेवर मेहनत घेतली असती तर नक्कीच हा ‘वॉर’ उजून उत्कंठावर्धक आणि रंजक ठरला असता असं मला वाटतं.

‘टीव्ही 9 मराठी’कडून वॉरला मी देतोय दोन स्टार्स….

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.