जालन्यात नराधम टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण, 5 जणांना अटक

जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक करण्यात (Jalna Couple Beaten) आली आहे.

जालन्यात नराधम टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण, 5 जणांना अटक

जालना : जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक करण्यात (Jalna Couple Beaten) आली आहे. जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. तरुणीचा विनयभंग करतानाचा व्हिडीओ गावगुंडांनी शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर टीकेची झोळ उठली होती. तसेच या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचीही मागणी होत आहे.

जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अतिष खंदारे असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव आहे. तर कारभारी वाघ , कृष्णा वाघ , सुशील वाघ अशी इतर काही आरोपींची नावं आहे.

नेमंक प्रकरण काय? 

बुलडाणा जिल्ह्यातील तरुण आणि तरुणी गोंदेगावात फिरायला आले होते. यावेळी तळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना टोळक्याने गाठलं आणि धमकावायला सुरुवात केली.

‘आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तळं असल्यामुळे आम्ही फिरायला आलो’ असं तरुण काकुळतीला येऊन चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हाता-पाया पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र मस्तवाल तरुणांनी तरुणीच्या वडिलांना फोन करण्यास सांगितलं.

संपूर्ण व्हिडीओमध्ये गावगुंड तरुणीची कॉलर पकडून तिला फरपटत नेताना दिसत आहे. तरुण सारखं ‘दादा, तिला सोडा, आम्ही परत येणार नाही’ अशा शब्दात गयावया केल्या. तरुणाने आपल्या भावाला फोन लावून बोलवून घेण्याचीही विनंती केल्याचं व्हिडीओत दिसतं.

प्रेमी युगुलाला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध आणि चीड व्यक्त होताना दिसत आहे. ही घटना नेमकी कधी घडली, हे अद्याप समजलेलं नाही. व्हिडीओ अर्धवट असल्यामुळे पीडित तरुणी आणि तरुण कुठे आहेत? याविषयीही काहीही समजलेलं (Jalna Couple Beaten) नाही.

संबंधित बातम्या : 

जालन्यात नराधम टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण, तरुणीचा विनयभंग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI