US Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारीसाठी निवड झाली आहे (Kamala Harris become US Vice Presidential Candidate).

US Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 6:50 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची उपराष्ट्रपती पदासाठी घोषणा केली आहे (Kamala Harris become US Vice Presidential Candidate). कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या असून याआधी अमेरिकेत केवळ दोनवेळा महिलांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्या दोन्ही कृष्णवर्णीय नव्हत्या.

डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली ((Joe Biden US Presidential Candidate). जो बिडेन म्हणाले, “मला अभिमान आहे की देशाच्या सर्वोत्तम जनसेवकांपैकी एक निर्भिड कमला हॅरिस यांना मी माझा सहकारी म्हणून निवडलं आहे. अमेरिकेच्या या निवडणुकीत त्या माझ्या सहकारी म्हणून सहभागी होतील.”

हेही वाचा : Corona Vaccine | रशियाच्या राष्ट्रपतींनी स्वत:च्या मुलीलाच कोरोना लस टोचली, अमेरिका-ब्रिटनला लसीवर शंका

या निर्णयाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीच्या निकालात जो बिडेन यांची ही घोषणा मोठा निर्णय ठरू शकतो.

आपल्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदारीवरील निवडीनंतर कमला हॅरिस म्हणाल्या, ” जो बिडेन यांना कमांडर इन चीफ बनवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. बिडेन अमेरिकेच्या नागरिकांना एक करु शकतात. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आमच्यासाठी संघर्ष करण्यात घालवलं आहे. मला या पदाच्या उमेदवार म्हणून निवडले गेले याचा मला अभिमान आहे.”

कमला हॅरिस यांची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांची बहिण माया हॅरिस यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच ओकटाऊनमधील एक छोटीशी मुलगी अमेरिकेच्या प्रमुख पक्षाची उपराष्ट्रपती पदाची उमेदवार होणारी पहिली कृष्णवर्णीय मुलगी बनली आहे. हे अविश्वसनीय आहे, मला तुझा अभिमान आहे बहिणी.”

हेही वाचा : Corona World News | Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा

दुसरीकडे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनने म्हटलं आहे, “हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. कमला हॅरिस एक उत्तम सहकारी सिद्ध होईल आणि जो बिडेन यांची टीम अधिक मजबूत बनेल.”

अमेरिकेत आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली नाही

अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकू शकलेली नाही. याआधी दोन महिलांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली. 2008 मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून सारा पॅलिन यांना तर 1984 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून गिरालडिन फेरारो यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असं असलं तरी अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कमला हॅरिस कॅलिफोर्नियाची अटॉर्नी जनरल देखील राहिल्या आहेत.

हेही वाचा :

चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ

सुपरपॉवर अमेरिकेच्या गुप्त शस्त्रसाठ्यावर चीनचा डोळा, हल्ल्याच्या भीतीने अमेरिकाही सतर्क

Kamala Harris become US Vice Presidential Candidate

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.