सातारा जिल्ह्याचा आढावा | राष्ट्रवादी गड कसा राखणार?

सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 5 जागा एकट्या राष्ट्रवादीकडे, 2 काँग्रेसकडे आणि 1 शिवसेनेकडे आहे.

सातारा जिल्ह्याचा आढावा | राष्ट्रवादी गड कसा राखणार?
Follow us
| Updated on: Sep 11, 2019 | 3:22 PM

सातारा : सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 5 जागा एकट्या राष्ट्रवादीकडे, 2 काँग्रेसकडे आणि 1 शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात राष्ट्रवादीला भगदाड पडलं आहे. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्यात राजकीय चित्र कसं असेल हे पाहावं लागेल.

1) सातारा-जावळी विधानसभा (Satara javli Vidhan sabha)

शिवेंद्रराजे भोसले यांनी 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाजी मारली. आता शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

दुसरीकडे पुन्हा एकदा भाजपाच्या दीपक पवार यांनी शिवेंद्राराजे भोसले यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी ‘भाजप बचाव, शिवेंद्र हटाव’चा नारा दिला. इतकंच नाही तर 288 भाजपच्या बूथ प्रमुखांनी दीपक पवार यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला आणि एकमुखी शिवेंद्रराजेंच काम करायच नाही असा नारा लगावल्यामुळे या विधानसभा उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष आहे .

सातारा विधानसभा 2014 निकाल

 • राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार शिवेंद्रराजे भोसले
 • मिळालेली मते -९७,९६४
 • भाजपचे पराभूत उमेदवार दीपक पवार -५०,१५१

—————————————-

2) कोरेगाव  विधानसभा (Koregaon Vidhan sabha)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. कोरेगाव मतदारसंघ तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला आहे तो अजून कायम आहे.   शशिकांत शिंदे यांची मतदारसंघातील पकड बघता राष्ट्रवादी या ठिकाणी दुसरा पर्याय शोधेल असं वाटत नाही. शिंदेंसमोर भाजपच्या महेश शिंदे यांचं आव्हान असू शकतं.

कोरेगाव विधानसभा 2014 निकाल

 • राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार शशिकांत शिंदे- मिळालेली मते -९५,२१३
 • काँग्रेसचे पराभूत उमेदवार विजयराव कणसे मिळालेली मते- ४७,९६६

———————————-

3) वाई विधानसभा मतदारसंघ (Wai Vidhan sabha)

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मकरंद पाटील हे वाई विधानसभेचं प्रतिनिधीत्व करतात. सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा महाबळेश्वर हा तीन तालुक्यांचा मिळून तयार झालेला विधानसभा मतदार संघ एक महत्वाचा मतदार संघ आहे. भौगोलिकरित्या विस्तीर्ण अशा या भागातले प्रश्नही अनेक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात कोणाची उमेदवारी राहणार, याचीच चर्चा गावागावांतील पारांवर रंगत आहे. या ठिकाणी भाजपा शिवसेनेबरोबरच रिपब्लिकन पक्षाने आपला हक्क सांगितला असला तरी, नेमकी संधी कोणाला मिळणार याकडे लक्ष आहे.

काँग्रेसला रामराम ठोकून नुकतेच भाजपवासी झालेल्या मदन भोसले यांना उमेदवारी देऊन भाजप गनिमी कावा साधणार, की शिवसेना लढणार  याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

वाई विधानसभा 2014 निकाल

 • राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार- मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटील – मिळालेली मते – १,०१,२१८
 • पराभूत उमेदवार काँग्रेसचे मदनराव भोसले- ६२,५१६

—————————————-

4) फलटण विधानसभा मतदारसंघ (Phaltan Vidhan Sabha)

राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता फलटण हा महत्वाचा मतदार संघ आहे. फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभावपंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटणची ओळख आहे. त्यासोबतच स्वराज्यात ज्या निंबाळकर घराण्याचा उल्लेख आढळतो त्या निंबाळकर घराण्याचे वंशज फलटणमध्ये आहेत. त्यातलं रामराजे निंबाळकर हे नाव आपल्याला परिचित आहे. सध्या माढा लोकसभेतून भाजपमधून खासदार झाले ते रणजितसिंह नाईक निंबाळकर ही याच फलटणचे.

फलटण विधानसभा मतदार संघात मागील काही पंचवार्षिक निवडणुकीत ज्या लढती झाल्या त्या थोडक्यात सांगायच्या म्हटलं तर याअगोदर २००९ साली झालेल्या विधानसभा  निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण यांच्यासमोर शिवसेनचे माजी आमदार बाबुराव माने,अपक्ष माजी आमदार लक्ष्मण माने हे उभे होते..त्यांनी शिवसेनचे माजी आमदार बाबुराव माने यांचा ३९,९१४ मतांनी पराभव करत ही निवडणूक जिंकली.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण यांच्यासमोर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून दिगंबर आगवणे शिवसेनेकडून डॉ .नंदकुमार तासगावकर यांनी आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दिगंबर आगवणे यांचा ३३,५६८ मतांनी पराभव करत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण यांनी निवडणूक जिंकली.

फलटण विधानसभा 2014 निकाल

 • राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार दीपक चव्हाण-  मिळालेली मते -९२,९१०
 • काँग्रेस पराभूत उमेदवार  – दिगंबर आगवणे मिळालेली मते-५९,३४२

——————————————

5) माण-खटाव विधानसभा (Man Khatav vidhan sabha)

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात असणारे मान खटाव दोन तालुके कायम चर्चेत असतात ते इथल्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या दुष्काळामुळे. केवळ दोन तालुक्यात चारा छावण्या असणारे हे देशातले एकमेव असे तालुके म्हणावे लागतील. या तालुक्याच राजकारणही कायम या दुष्काळाच्या समस्यांच्या अवती भोवती फिरत आले आहे.या मतदारसंघात काही गावे अशी आहेत ज्यांचा लोकसभा मतदारसंघाकरिता माढा या मतदार संघात समावेश होतो.

लोकसभेला माढा मतदारसंघात असणारा हा खटाव तालुक्यातील काही भाग  गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याकरिता वापरला.त्यामुळेच या मतदारसंघातून शरद पवारांसारखे राष्ट्रीय नेते निवडून येऊनही इथली जलसंधारणाची कामे ही होऊ शकलेली नाहीत.

सातारा जिल्ह्यातील हा दुष्काळी तालुका याच जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुभवणाऱ्या महाबळेश्वरपासून केवळ 50 किलोमीटरच्या हवाई अंतरात येतो. आजूबाजूच्या तालुक्यात पाण्याचे कालवे झाले मात्र हा तालुका आजही तहानलेला आहे. माणसांसाहीत जनावरे इथे मेटाकुटीला आली आहेत.

अशा या विधानसभा मतदारसंघाचे गेल्या दोन पंचवार्षिक पासून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी इथले जनमत आपल्या बाजूला ठेवण्यात यश मिळवले आहे. मागील 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे आणि रासप मधून निवडणूक लढवलेले शेखर गोरे यांच्यात चांगलीच लढत झाली होती. या लढतीत जयकुमार गोरेंनी बाजी मारली होती.

माण विधानसभा २०१४ निकाल

आय काँग्रेसचे विजयी उमेदवार जयकुमार गोरे – मिळालेली मते -७५,७०७

पराभूत उमेदवार रासपचे शेखर गोरे मिळालेली मते-५२,३५७

6) कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Karad South Vidhan sabha)

महाराष्ट्रातील काही लक्ष्यवेधी लढतींपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जाते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 2014 ला मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली त्यात यशही आले. याही वेळी त्यांनी लढण्याची तयारी केली आहे  मात्र ही निवडणूक त्यांना सोप्पी नाही. गेल्या पाच वर्षांत भाजपा नेते आणि विठ्ठलरुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनीही जोरदार तयारी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघातच घेरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातले आहे. अतुल भोसले यांना ताकद दिली आहे. कोट्यवधीची विकास कामे अतुल भोसलेंनी कराड दक्षिण मध्ये आणली असून त्यामुळे या मतदारसंघातील अनेक निवडणुकांमध्ये भाजपाने यश मिळवले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची क्लिन इमेज ही त्यांची जमेची बाजू आहे. मुख्यमंत्रीपदाच्या काळात अठराशे कोटीची  विकास कामे कराड दक्षिण मध्ये  आणली. मात्र त्याचा यापूर्वी झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये परिणाम झालेला दिसत नाही.
2014 चा निकाल 
 • पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस- 76831
 • विलासराव उंडाळकर, बंडखोर अपक्ष-60413
 • डाॅ. अतुल भोसले भाजपा 58568
 • डॉ अजिंक्य पाटील – शिवसेना 2373 असे मतदान मिळालेले होते.
7) कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ (Karad North Vidhan sabha)

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या धैर्यशील कदम यांचा पराभव केला.

2014 चा निकाल

 • बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी) – 78,324
 • धैर्यशील कदम (काँग्रेस) – 57,817
 • मनोज घोरपडे (स्वाभिमानी) – 43,903

8) पाटण विधानसभा मतदारसंघ 

शिवसेनेचे शंभूराजे देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. 2014 च्या निवडणुकीत शंभूराजे यांनी राष्ट्रवादीच्या सत्यजीत पाटणकर यांचा पराभव केला.

2014 चा निकाल

 • शंभूराजे देसाई – 104,419
 • सत्यजीत पाटणकर – 85,595

साताऱ्यातील आमदार

सातारा   जिल्हा – 08  (Satara MLA List)

 • 255 – फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
 • 256 – वाई – मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
 • 257 – कोरेगाव – शशीकांत शिंदे (राष्ट्रवादी)
 • 258 – माण – जयकुमार गोरे (काँग्रेस)
 • 259 – कराड उत्तर – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
 • 260 – कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
 • 261 – पाटण – शंभूराजे देसाई (शिवसेना)
 • 262 – सातारा – शिवेंद्रराजे भोसले विजयी (राष्ट्रवादी) सध्या (भाजप)
Non Stop LIVE Update
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप.
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी.
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर.
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप.
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?.
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप.
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून...
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून....
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'.
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?.