मालेगावच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण, नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना सचिन मोरे शहीद

नदीची पाणीपातळी वाढून तीन भारतीय जवान प्रवाहात सापडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन मोरे यांनी पाण्यात उडी घेतली (Malegaon Soldier Sachin More Martyr at Ladakh)

मालेगावच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण, नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना सचिन मोरे शहीद
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 4:17 PM

मालेगाव : लडाख सीमेवर भारतीय जवानांचे प्राण वाचवताना मालेगावच्या सुपुत्राला वीरमरण आले. गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असताना नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना मालेगाव तालुक्यातील छटा साकुरी झाप येथील सचिन मोरे शहीद झाले. (Malegaon Soldier Sachin More Martyr at Ladakh)

शहीद सचिन मोरे यांना वीरमरण आल्याने त्यांची आई, वडील, पत्नी, मुलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. साकुरी गावावर शोककळा पसरली आहे.

चिनी सैनिकांची घुसखोरी वाढल्याने लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे. संघर्षात वीस भारतीय जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच चीनने नदीच्या पाण्याचा हत्याराप्रमाणे वापर केला.

हेही वाचा : बिहार रेजिमेंट प्रमुख चिनी सैनिकांच्या तंबूत, सूर्यास्तावेळी धक्काबुक्की, 15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय काय झालं?

सीमेलगत भागात नदीवर पूल बांधणीचे काम सुरु असताना चीनने रोखलेला पाण्याचा प्रवाह सोडला. अचानक पाणीपातळी वाढून तीन भारतीय जवान प्रवाहात सापडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन मोरे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र मोठ्या दगडावर पडल्याने त्यांना वीरमरण आले.

शहीद सचिन मोरे हे एसपी 115 रेजिमेंट अंतर्गत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे 17 वर्ष अभियांत्रिकी विभागात ते कार्यरत होते.

शहीद सचिन मोरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, सहा महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. मोरे यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री पुणे येथे, तर शनिवारी साकुरी येथे आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा : निधड्या छातीने लढला, अतिरेक्यांशी भिडला, सोलापूरचा जवान पुलवामात शहीद

15 जून रोजी गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर काही सैनिक जखमी झाले

(Malegaon Soldier Sachin More Martyr at Ladakh)

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.