भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून नागरिकांशी संवाद साधणार

देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत (Man Ki Baat of PM Narendra Modi amid Corona).

भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून नागरिकांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत (Man Ki Baat of PM Narendra Modi amid Corona). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशभरात सुरु घोषित केलेल्या लॉकडाऊन आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यावर ते काही उपाययोजनांची घोषणा करणार का हेही या निमित्ताने स्पष्ट होणार आहे.

ऑल इंडिया रेडिओने पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. ते आज सकाळी 11 वाजता या कार्यक्रमात बोलतील. मन की बात कार्यक्रम प्रत्येक महिन्याच शेवटच्या रविवारी होतो. याआधी पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसविरोधात लढण्याचं आवाहनही रेडिओवरुनच केलं होतं. यावेळी त्यांनी सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचंही सांगितलं होतं.

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना कोरोना विषाणू नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचंही आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विट करत देशवासीयांना पंतप्रधान सहायता निधीमध्ये योगदान देण्याचंही आवाहन केलं. या निधीचा उपयोग यापुढीही अशाप्रकारच्या मोठ्या संकटाच्या काळात केला जाईल, असं ते म्हणाले.

देशात कोरोना संसर्गाने हजाराचा टप्पा गाठला आहे. सरकारने कोरोना नियंत्रणासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे शेती आणि शेतकऱ्यांवरही दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे देशातून शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणीही होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI