AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला, कोल्हापूरच्या दीडशहाण्यावर गुन्हा

कोल्हापुरात होम क्वारंटाईन असलेली व्यक्तीच चक्क अंबाबाई मंदिरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Corona | होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला, कोल्हापूरच्या दीडशहाण्यावर गुन्हा
| Edited By: | Updated on: Mar 25, 2020 | 4:00 PM
Share

कोल्हापूर : संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही (Man With Home Quarantine Stamp) राज्यात होम क्वारंटाईनचं उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात होम क्वारंटाईन असलेली व्यक्तीच चक्क अंबाबाई मंदिरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी  (Man With Home Quarantine Stamp) त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्रीन उद्धव ठाकरे यांनीही आधीच राज्यात संचारबंदी लागू केली होती. कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे सामाजिक दुरावा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करत होते.

मात्र, अनेकदा आवाहन करुनही काही लोक परिस्थितीच गांभीर्य न समजता समाजात वावरत होते. त्यामुळे अखेर सरकारला संपूर्ण देशाला 21 दिवसांसाठी लॉक डाऊन करण्यात आलं. त्यानंतरतरी नागरिक घरात राहातील अशी आशा मोदींनी व्यक्त केली.

मात्र, देशात लॉक डाऊन झाल्यानंतरही नागरिक ऐकायला तयार नाहीत. सामान्य व्यक्तीच नाही तर ज्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का आहे, तेही समाजात (Man With Home Quarantine Stamp) वावरत आहे. होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर असतानाही एक व्यक्ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गेली. पूजेच्या साहित्यासह गरुड मंडपात गेलेल्या या व्यतीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला थेट उपचारासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्षात दाखल केलं. तसेच, या बेजबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 116 वर

दुसरीकडे, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 116 वर पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. तर मुंबईतील चौघे जणही कोरोनाबाधित झाले आहेत.

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन

“कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढचे 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हे 21 दिवस नाही सांभाळलं तर आपला देश आणि आपण 21 वर्ष मागे जाऊ. अनेक कुटुंब उध्वस्त होतील. ही गोष्ट मी पंतप्रधान म्हणून नाही तर आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून बोलत आहे. त्यामुळे बाहेर पडू नका, घरातच राहा”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे मंगळवारी रात्री आठ वाजता पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

“देशाला वाचवणं ही भारत सरकार, राज्य सरकार, प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पंतप्रधान म्हणून माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे मी विनंती करतो, तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. हा लॉकडॉऊन 21 दिवसांता असेल. याचा अर्थ 3 आठवड्यांचा असेल. येणारे पुढचे 21 दिवस फार महत्त्वाचे आहेत. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत”, असं नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

Man With Home Quarantine Stamp

संबंधित बातम्या :

Corona Effect : पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा, किमतींनी ओलांडली शंभरी

नवी मुंबईत मशिदीच्या मौलवीला कोरोना, तीन फिलिपिनी नागरिकांनाही संसर्ग

अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा, मोदी-शाहांच्या मराठीत शुभेच्छा

गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट, शिर्डी ते तुळजापूर, साध्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.