उदयनराजे आणि रामराजे यांच्यातला अबोला अखेर संपला, साताऱ्यात दोघांच्या मनसोक्त गप्पा

या दोघांमधील वाद इतका ताणला गेला होता की खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

उदयनराजे आणि रामराजे यांच्यातला अबोला अखेर संपला, साताऱ्यात दोघांच्या मनसोक्त गप्पा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 31, 2020 | 9:30 PM

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहित आहे. पण आज या दोन नेत्यांमधील वाद संपल्याचं पाहायला मिळालं. कारण, सातारा शासकीय विश्रामगृहात हे दोघेही दिलखुलास गप्पा मारताना दिसले. त्यामुळे 2014 च्या निवडणुकांपासून सुरू असलेला अबोला संपला की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे. (mp udayanraje bhosale and ramraje naik nimbalkar meet in satara)

सातारा शासकीय विश्रामगृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला अबोला आज संपला असल्याचं पहायला मिळालं. दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून वाद निर्माण झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. राष्ट्रवादीमध्ये असणारे उदयनराजे अचानक खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंवर टीका केली होती.

या दोघांमधील वाद इतका ताणला गेला होता की खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण उदयनराजे यांच्या स्वभावामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे या दोघांमधील वाद वेळोवेळी सातारा जिल्ह्याने पाहिला होता. मात्र, आज शासकीय विश्रामगृहात दोघांना दिलखुलास गप्पा मारताना पाहिल्यानंतर या दोघांमधील अबोला संपला असल्याचं पहायला मिळालं.

लोकसभा निवडणुकांनंतर रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाची जोरदार चर्चा सुरू होती. कारण एक दिवस उदयनराजे यांनी थेट फलटनला जाऊन रामराजेंना चॅलेंज केलं होतं. पण आज या वादंगावर पडदा पडल्याचं दिसलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आदर देत स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्याच्या माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

इतर बातम्या –

US Election 2020: ट्रम्प यांना मागे टाकत 8 अंकांनी बायडेन आघाडीवर – सर्वे

एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका; दमानिया यांचं राज्यपालांना साकडं

(mp udayanraje bhosale and ramraje naik nimbalkar meet in satara)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें