AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरजातीय विवाह केल्याने दलित युवकाची पोलिसांसमोरच हत्या

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे आंतरजातीय विवाह केल्याने पोलिसांच्या समोरच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आंतरजातीय विवाह केल्याने दलित युवकाची पोलिसांसमोरच हत्या
| Updated on: Jul 09, 2019 | 9:31 PM
Share

अहमदाबाद: गुजरातमध्ये अहमदाबाद येथे आंतरजातीय विवाह केल्याने पोलिसांच्या समोरच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून सवर्ण जातीतील लोकांनी हरेश सोलंकी (25 वर्षे) या दलित युवकाची तलवारीने कापून हत्या केली.

संबंधित युवक आपल्या नवविवाहित पत्नीला घेण्यासाठी सासरवाडीला जात होता. यासाठी संबंधित युवकाने सुरक्षेसाठी गुजरात सरकारच्या ‘अभयम’ हेल्पलाईन पथकाची मदत घेतली. संबंधित पोलीस पथक सोबत असतानाही सवर्ण जातीतील लोकांनी तलवारीने युवकावर हल्ला केला. अहमदाबाद ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन एका व्यक्तीला अटक केले आहे.

दलित युवकावर हल्ला करणाऱ्यांपैकी अन्य 7 आरोपी फरार आहेत. संबंधित 7 आरोपी एकाच गावचे रहिवासी असून त्यांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘अभयम’ हेल्पलाइनचे समुपदेशक बाविका भागोरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हरेश सोलंकी सवर्ण जातीतील पत्नी उर्मिलाला आणण्यासाठी अहमदाबाद जिल्ह्यातील वारमोर गावात (तालुका – मंडल) जात होता. दरम्यान, धारदार हत्यारं घेऊन जवळपास 10 लोकांनी हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी गुजरात सरकारच्या ‘अभयम’ हेल्पलाइन पथकाच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि पोलीसही जखमी झाले.

घटनास्थळावर पोहचलेले दलित कार्यकर्ते किरीट राठोड यांनी सांगितले, “हरेश आणि उर्मिला कादी येथील एका महाविद्यालयात शिकत होते. त्यांनी 6 महिन्यांपूर्वीच लग्न केलं. हरेश सोलंकी कच्छ जिल्ह्यातील गांधीधामचा रहिवासी होता.”

लग्नाला घरच्यांचा विरोध

हरेश दलित असल्याने उर्मिलाच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. लग्नानंतर उर्मिलाच्या कुटुंबीयांनी गोड बोलून तिला माहेरी नेले आणि तिला पुन्हा पतीकडे पाठवू असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर उर्मिलाच्या घरच्यांनी तिला परत पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर हरेशने 181 ‘अभयम’ महिला हेल्पलाईनशी संपर्क केला. हेल्पलाईनचे पथकाने हरेशसोबत जाऊन मुलीच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पथकाचे काहीही ऐकून घेता बोलायलाच नकार दिला. मात्र, काहीवेळेतच तेथे अनेक लोक जमा झाले आणि त्यांनी हल्ला केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.