लाचखोरांना पकडणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात लाचप्रकरणात गुन्हा दाखल

एका स्पेशल ब्राँच पोलिस ऑफिसरवर त्यांच्याच एका पोलीस निरीक्षकाविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात (Anti corruption police demand bribe) आला आहे

लाचखोरांना पकडणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात लाचप्रकरणात गुन्हा दाखल
Namrata Patil

|

Dec 25, 2019 | 6:06 PM

नागपूर : एका स्पेशल ब्राँच पोलिस ऑफिसरवर त्यांच्याच एका पोलीस निरीक्षकाविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात (Anti corruption police demand bribe) आला आहे. पंकज उकंडे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून सामान्य माणसाने कोणाकडे जायचं असा प्रश्न उपस्थित होत (Anti corruption police demand bribe) आहे.

पंकज उकंडे यांनी भूमापन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचे लाच घेण्याबाबतचे जुने प्रकरण उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात एका महिला अधिकाऱ्याच्या नावाचा समावेश होता. उकंडे यांनी त्या महिलेला सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र या महिलेने स्पेशल ब्रांच पोलीस अधिकारीच लाच मागत असल्याची तक्रार नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील वरिष्ठ अधीक्षकांकडे केली.

या तक्रारीनंतर त्याबाबतची सविस्तर चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर यात स्वत:च्या अधिकाऱ्याचा दोष आढळला. यानंतर एसबीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतर काल (24 डिसेंबर) रात्री पोलीस निरीक्षक पंकड उकंडे यांच्याविरोधात अडीच लाखांची लाच मागणे याबाबत (Anti corruption police demand bribe) गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याची नोंद केल्याचे कळताच पंकज उकंडे हे फरार झाले. त्यानंतर एसबीने जयताळा परिसरात उकंडे राहत असलेल्या फ्लॅटची तपासणी सुरु केली आहे. त्यातील कागदपत्रांची चौकशीही केली जात आहे.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उकंडे हे 4 महिन्यापूर्वीच अँटी करप्शन ब्युरोमध्ये बदली होऊन आले होते. त्यांच्याकडे भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्याची लाचेची प्रकरण सोपवण्यात आले होते. त्याच तपासादरम्यान उकंडे यांनी लाचेची मागणी केल्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांवर त्यांच्याच अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची नामुष्की ओढविली (Anti corruption police demand bribe) आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें