AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लासलगाव जळीतकांड : पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

नाशिक येथील लासलगाव जळीतकांडातील पीडित महिलेचा मुंबईत उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू

लासलगाव जळीतकांड : पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
| Updated on: Feb 22, 2020 | 9:19 AM
Share

मुंबई : नाशिक येथील लासलगाव जळीतकांडातील पीडित महिलेचा मुंबईत उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला (Lasalgaon Burn Lady Death). गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेली पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर संपली. मुंबई येथील मसिना रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली (Lasalgaon Burn Lady Death).

मुंबईतील जेजे रुग्णालयात मृत पीडित महिलेचे शवविच्छेदन केले जाणार. त्यानंतर तिला अंतिम संस्कारासाठी लासलगाव येथे आणले जाईल. महिलेच्या पार्थिवावर लासलगाव येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या 15 फेब्रुवारीला लासलगाव एसटी बस स्थानकावर झटापटीत ही पीडित महिला भाजली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी रामेश्वर भागवत, पेट्रोल पंप व्यवस्थापक आणि पंप कर्मचारी आकाश शिंदे या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवतला निफाड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर पेट्रोल पंप कर्मचारी आकाश शिंदे याला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावून जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र, पेट्रोल पंप व्यवस्थापकाला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील लासलगावच्या पिंपळगावानजीक तीन मुलांसह पीडित महिला राहत होती. दोन वर्षांपूर्वी पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर घराजवळच राहत असलेल्या रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत याच्याशी पीडितेचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघांनी मित्राच्या साक्षीने लासलगाव तालुक्यातील विंचूर गावाजवळील लोणचे देवीच्या मंदिरात लग्न केले.

या लग्नानंतर रामेश्वरचा त्याच्या मामाच्या मुलीशी साखरपुडा झाल्याची माहिती या पीडित महिलेला मिळाली. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद सुरु झाले. हे लग्न कथित पती आणि विधवेच्या घरच्यांना मान्य नसल्याने याविषयी बोलण्यासाठी दोघांची भेट लासलगाव येथील बस स्थानकावर झाली. आरोपीला भेटण्याअगोदर पीडित महिलेने आपल्या दुचाकीत आणि पन्नास रुपयांचे बाटलीत पेट्रोल भरले होते. ती बाटली पीडितेने गाडीच्या डिक्कीत ठेवली.

यानंतर पीडित महिला लासलगाव बस स्थानकावर पोहोचली. तिथे आरोपी रामेश्वर आणि त्याचा मामा उभेच होते. पीडित महिला आणि रामेश्वर यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि पीडित महिला गाडीजवळ गेली. तिने गाडीच्या डिक्कीतून पेट्रोलने भरलेली बाटली काढली आणि आपल्या अंगावर पेट्रोल टाकू लागली. यावेळी रामेश्वर पीडितेच्या हातून पेट्रोलची बाटली खेचू लागला आणि ‘तू कशाला मरतेस? मीच मरतो’, असं म्हणाला. या झटापटीत बाटलीतील पेट्रोल दोघांच्या अंगावर पडले.

रामेश्वरला सिगारेट पिण्याची सवय असल्याने त्याच्या खिशात माचिस होती. त्याने या माचिसच्या बॉक्समधून काडी काढून पेटवली आणि “मी आता मलाच पेटून घेतो”, असे रामेश्वर बोलताच पीडित महिलेने त्याच्या हातातील पेटती काडी ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पीडित महिलेच्या अंगावर पेटती काडी पडली. यात ही पीडित महिला 67% भाजली.

पीडित महिला पेटत असताना आरडाओरड करु लागली. पीडितेचा आवाज ऐकताच बस स्थानकावरील प्रवाशांनी धाव घेतली. त्यांनी पीडित महिलेला लागलेली आग विझवली. या घटनेमुळे रामेश्वर आणि त्याचा मामा तिथून पळून गेला. या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला उपचारासाठी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेत पीडित महिला 67 टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

बाटलीत पेट्रोल देणे हा अपराध

लासलगाव येथील गुंजाळ पेट्रोलपंप हा सध्या येवला येथील शिवसेना नेत्याच्या भावाने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला आहे (Lasalgaon lady burn case). बाटलीमध्ये पेट्रोल दिल्याने पेट्रोलपंपाचे मॅनेजर आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालय काय म्हणाले?

लासलगाव येथील महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयीत आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत यास निफाड येथील वरीष्ठ स्तर न्यायाधीश एस.बी.काळे यांच्या समोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली होती. त्याशिवाय, पोलिसांनी आरोपीवर लावलेले कलम हे जामीनपात्र असल्याने कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली असल्याने पीडित महिलेने जरी काही जवाब दिला असेल, मात्र यात पीडित महिला गंभीर भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे आपण त्रयस्त शासकीय यंत्रणा म्हणून तपास करावा. याप्रकरणात कलम 326 वाढवण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.