Drugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता

एनसीबीने आज (26 सप्टेंबर) दीपिका पदुकोणसह सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्या चौकशीनंतर त्यांचे फोन जप्त केले आहेत (NCB has seized phones of Deepika Padukone Sara Ali Khan Shraddha Kapoor).

Drugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता


मुंबई : एनसीबीने आज (26 सप्टेंबर) दीपिका पदुकोणसह सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्या चौकशीनंतर त्यांचे फोन जप्त केले आहेत (NCB has seized phones of Deepika Padukone Sara Ali Khan Shraddha Kapoor). सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीने एकूण 7 जणांचे फोन जप्त केले आहेत. यात दीपिका पदुकोण, सारा अली कान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीति सिंह, सिमोन खंबाटा, करिश्मा आणि जया साहा यांचा समावेश आहे. या फोनमधील डाटाच्या आधारे अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे एनसीबी या जप्त फोनमधील डिलीट केलेला डाटा देखील मिळवू शकते. त्यामुळे या सर्व अभिनेत्रींबाबत एनसीबीला मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची करण्यात आलेल्या साडेपाच तासाच्या चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली आहे. मात्र तिने ड्रग्ज सेवन केल्याचं अमान्य केलं आहे. दीपिकापाठोपाठ सारानेही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी तिच्याकडून एनसीबीने फोनही काढून घेतला होता. तब्बल साडेपाच तासाच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर दीपिकाची चौकशी संपली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा ड्रग्जचं सेवन करायचा, अशी कबुली अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने एनसीबीच्या चौकशीत दिली आहे. या चौकशीत या दोन्ही अभिनेत्रींनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सारा आणि श्रद्धा कपूरची चौकशी संपली असून श्रद्धाची साडेपाच तर साराची साडेचार तास चौकशी करण्यात आली.

सुशांतसोबत रिलेशनशीपमध्ये होते: सारा

यावेळी सारा अली खानने आजपर्यंत समोर न आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती एनसीबीला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. सुशांतसिंह आणि मी रिलेशनशीपमध्ये होते. त्याच्याबरोबर मी थायलंडलाही जाऊन आले होते, असं साराने म्हटलं आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय असू शकतं? याची माहिती साराकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

सारा आणि श्रद्धाचीही चौकशी संपली; एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर

Deepika Padukone | दीपिकाची चौकशी संपली; साडेपाच तासानंतर एनसीबीच्या कार्यालयातून रवाना

Drugs Case LIVE | दीपिकाची साडेपाच तास, तर सारा अली खानची साडेचार तास चौकशी

Kshitij Prasad Arrest | ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक

Drugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच माहिती लीक करत आहे असं सिद्ध होईल : सचिन सावंत

संबंधित व्हिडीओ :

NCB has seized phones of Deepika Padukone Sara Ali Khan Shraddha Kapoor

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI