पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी, आम्ही इलाज करुन दाखवला, नितीश कुमारांचा हल्लाबोल

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी होतं पण आम्ही इलाज करुन दाखवला, असा हल्लाबोल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला.

पती-पत्नीच्या सरकारमुळे बिहार आजारी, आम्ही इलाज करुन दाखवला, नितीश कुमारांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 11:19 PM

पाटणा : लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी पती-पत्नीने 15 वर्ष बिहारवर राज्य केलं. त्यावेळी बिहारमध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था नव्हती. बिहार आजारी होतं. मात्र आमच्या काळात आम्ही सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था उभारली. आम्ही इलाज काय असतो हे जनतेला दाखवून दिलं, असं टीकास्त्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोडलं आहे. (Nitish Kumar Attacked On lalu prasad yadav And Rabri Devi)

बिहार निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातला प्रचार सुरु झाला आहे. आज (सोमवारी) नितीश कुमार यांनी जेडीयू कार्यालयामधून व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नितीश कुमार आणि राबडीदेवी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

“आमचं उदिष्ट आहे की बिहारच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत विकास झाला पाहिजे. समाजातल्या अंतिम लोकांपर्यंत सरकारचं काम पोहचलं पाहिजे. सरकारच्या योजना पोहचल्या पाहिजे. केंद्र सरकारशी मिळून कोव्हिड काळात बिहार सरकारने उत्तम काम केलं. अगोदरच्या सरकारच्या काळात 1 महिन्याला 39 लोक सरकारी दवाखान्यात जायचे. आम्ही मोफत औषधे देणं सुरु केल्यावर एका महिन्यात जवळपास 10 हजार लोक सरकारी इस्पितळात जायला लागले”, असा दावा नितीश कुमार यांनी केला.

महिलांचा मोठ्या प्रमाणात विकास

“जनतेची सेवा करणं माझा धर्म आहे. आम्ही समाजातल्या सगळ्या वर्गांसाठी काम केलं आहे. आम्ही महिलांसाठी मोठं काम केलंय. महिलांना आरक्षण दिलंय. गेल्या सरकारच्या काळातील आणि आजच्या सरकारच्या काळातील महिलांच्या विकासाची तुलना केली तर लक्षात येईल की आमच्या सरकारने नक्कीच महिलांसाठी मोठं काम केलंय”, असं नितीश कुमार म्हणाले.

जनतेसाठी आमचं मोठं काम

कोरोनाच्या काळात जनतेसाठी आम्ही अहोरात्र काम केलंय. परंतु विरोधक सरकारच्या चुका काढत असतात. पण जनतेला हे चांगलं माहितीये की सरकारने किती काम केलंय. कोरोनाकाळात आमच्याएवढं काम दुसरं कुणीच केलं नसेल. विरोधक फक्त आरोप करत आहेत, असं नितीश कुमार म्हणाले.

(Nitish Kumar Attacked On lalu prasad yadav And Rabri Devi)

संबंधित बातम्या

निवडणूक प्रचारात गळाभेटीवर बंदी; बिहार सरकारचे फर्मान

बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मोदी, शाहांसह फडणवीस करणार बिहारमध्ये प्रचार; भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

बिहारसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातून फक्त संजय निरुपम यांचा समावेश

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.