मॉर्निंग वॉकचा बनाव करुन पतीची हत्या, पिंपरीत पत्नी अटकेत

कौटुंबिक कलह आणि विवाहबाह्य संबंधातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं. गुन्हे शाखा आणि देहूरोड पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

मॉर्निंग वॉकचा बनाव करुन पतीची हत्या, पिंपरीत पत्नी अटकेत

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी चिंचवडच्या देहूरोड येथे मंगळवारी हत्येची घटना समोर आली होती (Wife Murder Husband In Dehuroad). यामध्ये एका युवकाच्या डोक्यात आणि गळ्यावर फावड्याने वार करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळालं आहे. या युवकाच्या पत्नीने मॉर्निंग वॉकचा बहाणा करत त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली असून कौटुंबिक कलह आणि विवाहबाह्य संबंधातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं. गुन्हे शाखा आणि देहूरोड पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला (Wife Murder Husband In Dehuroad).

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मयूर गायकवाड या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं. मयुरच्या डोक्यात आणि गळ्यावर फावड्याने वार करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.

पती मयूर गायकवाडची हत्या करण्यासाठी पत्नी ऋतू गायकवाडने (वय – 20) मॉर्निंग वॉकचा बहाणा केला होता. गेली चार दिवस ती शेजाऱ्यांना घेऊन मॉर्निंग वॉकला जात असे. मंगळवारी हत्या करण्यापूर्वीही तिने तोच दिनक्रम ठेवला. पण पोलिसांना दिलेल्या जबाबात तफावत आढळली आणि तिचे बिंग फुटले. कौटुंबिक कलह आणि विवाहबाह्य संबंधातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं. गुन्हे शाखा आणि देहूरोड पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला (Wife Murder Husband In Dehuroad).

सुरुवातीला पोलिसांनी मयुरची पत्नी ऋतू गायकवाडला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यावेळी तिने मयूर नेहमीच लैंगिक छळ करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे तिच्याकडे त्याला संपवण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता असं तिने सांगितलं. त्यासाठी तिने 4 दिवसांपासून प्लान केला होता. तिने शेजारी राहणारी एक महिला आणि काही लहान मुलांसोबत मॉर्निंग वॉकला जाण्यास सुरुवात केली. ती नवरा घरी एकटा असण्याची वाट पाहत होती. सोमवारी रात्री तिची सासू रात्रपाळीला ड्युटीवर गेली आणि तिचा दीरही घरी येणार नव्हता. या संधीचा तिने फायदा उचलला.

ऋतूने रात्रभर मयूरला संपवण्याचा विचार केला. सकाळी ती नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेली. तिथून आल्यावर तिने मयूर झोपेत असताना त्याच्या डोक्यावर आणि मानेवर फावड्याने वार केले. पतीला मारत असताना तिच्या कपड्यांवर जे रक्त उडालं ते तिने पाण्याने साफ केलं आणि लहान मुलांसोबत सायकलिंग करायला निघून गेली. त्यानंतर घरी परत आल्यानंतर अज्ञातांनी पतीची हत्या केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांच्या तपासात तिचं बिंग फुटलं.

Wife Murder Husband In Dehuroad

संबंधित बातम्या :

घरातून अपहरण झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला, साताऱ्यात हळहळ

लॉकडाऊनमध्ये आश्रय, नवी मुंबईत अल्पवयीन मुलगा सोन्याच्या दागिन्यांसह पसार

Published On - 4:00 pm, Thu, 1 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI