चंद्रपुरातील लॉजवर पोलिसांची धाड, 13 महाविद्यालयीन जोडपी ताब्यात

शहरातील वर्दळीच्या चौकातील लॉजवर धाड टाकून पोलिसांनी 13 महाविद्यालयीन जोडप्यांना ताब्यात घेतलं. नागपूर महामार्गावरील जनता चौकात हा धक्कादायक प्रकार घडला.

चंद्रपुरातील लॉजवर पोलिसांची धाड, 13 महाविद्यालयीन जोडपी ताब्यात

चंद्रपूर : शहरातील वर्दळीच्या चौकातील लॉजवर धाड टाकून पोलिसांनी 13 महाविद्यालयीन जोडप्यांना ताब्यात घेतलं. नागपूर महामार्गावरील जनता चौकात हा धक्कादायक प्रकार घडला (Chandrapur Lodge Raid). जनता चौकातील रेणुका गेस्ट हाऊसवर धाड टाकून पोलिसांनी या जोडप्यांना ताब्यात घेतलं. शिवाय, गेस्ट हाऊस मालकालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैक्षणिकदृष्ट्या गजबजलेल्या भागात अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे (Chandrapur Lodge Raid).

चंद्रपुरातील नागपूर महामार्गावरील जनता चौक येथील रेणुका गेस्ट हाऊसमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिक रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई केली, तेव्हा या गेस्ट हाऊसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 13 महाविद्यालयीन जोडपी आढळून आली. या सर्व जोडप्यांना रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गेस्ट हाऊस मालक आणि त्याचा साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या गेस्ट हाऊसच्या खोल्या कुठल्याही व्यक्तीची शहानिशा न करता, रेकॉर्डविना प्रती तास तत्वावर जोडप्यांना दिल्या जात होत्या, अशी माहिती पुढे आली आहे. गेस्ट हाऊसचा परिसर चंद्रपूर शहरातील शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा परिसर असून या परिसरात सुरु असलेल्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. रामनगर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास चालविला असून सध्या तरी कुठलीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI