‘प्रहार जनशक्ती’च्या माजी जिल्हाध्यक्षावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरातील पोलीस कार्टरजवळ गोळीबार (tushar pundkar Died)  झाला.

'प्रहार जनशक्ती'च्या माजी जिल्हाध्यक्षावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरातील पोलीस कार्टरजवळ गोळीबार (tushar pundkar Died)  झाला. यात तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान हा गोळीबार कोणी केला याबाबत सध्या तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 10.30 च्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरातल्या पोलीस कॉर्टरजवळ अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात पुंडकर गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला शहरातल्या आयकॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समजताच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे अकोटकडे रवाना झाले. मध्यरात्री 2.51 च्या दरम्यान पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

पुंडकर यांच्यावर हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या गोळीबाराचा तपास अकोट पोलिसांकडून सुरु (tushar pundkar Died) आहे.

कोण आहेत तुषार पुंडकर? 

  • तुषार पुंडकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षातील अकोल्याच्या जिल्हाध्यक्षपदी काम केले.
  • बच्चू कडू यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
  • तुषार पुंडकर हे प्रहार जनशक्तीचे धडाडीचे कार्यकर्ते होते.
  • काही वर्षांपूर्वी  बच्चू कडू यांना नागपूरमध्ये एका व्यक्तीने धमकी दिली होती. त्यावेळी पुंडकर यांनी नागपूरमध्ये जाऊन धमकी देणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली होती. त्यानंतर ते बच्चू कडू यांच्या संपर्कात आले.
  • बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर पुंडकर यांना अकोल्याच्या जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं.
  • तुषार पुंडकर हे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पदाधिकारीही होते.
  • त्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आणि जिल्हाध्यक्ष म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI