प्रचंड कष्ट, लोकांचं प्रेम आणि शरद पवार या गोष्टी कधीही वेगळ्या न करता येण्याजोग्या : रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनीही साताऱ्यातील पावसातल्या सभेच्या आठवणींना उजाळा देत भाजपला चिमटे काढले आहेत.

प्रचंड कष्ट, लोकांचं प्रेम आणि शरद पवार या गोष्टी कधीही वेगळ्या न करता येण्याजोग्या : रोहित पवार
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 3:51 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातल्या ऐतिहासिक सभेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सातारच्या ऐतिहासिक सभेच्या आठवणी जागवत आहेत. शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही साताऱ्यातील पावसातल्या सभेच्या आठवणींना उजाळा देत भाजपला चिमटे काढले आहेत. (Rohit pawar Facebook Post on Sharad pawar Rain Ralley In Satara)

आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा. काही घटनाक्रम हे मनःपटलावर कायमचे कोरले जात असतात. त्यातील ही एक महत्वाची घटना असल्याचं रोहित पवार म्हणाले.

“साताऱ्यातील शरद पवारांचं भाषण ऐकायचा मोह खुद्द वरुणराजाला देखील आवरला नाही. वरुन मेघराजा बरसत होता आणि त्याच जलधारा अंगावर घेत व्यासपीठावर ८० वर्षाचा तरुण जाणता राजा गर्जत होता. पण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी झालेली अलोट गर्दी किंचितही विचलित न होता स्तब्ध होती. साहेबांचा एक एक शब्द कानात साठवून ठेवत होती. साहेबांनी जाहीरपणे चूक कबूल करत ती दुरुस्त करण्याची साद जनसमुदायाला घातली आणि पुढं काय झालं हे आपल्याला माहीतच आहे”, असं म्हणत रोहित यांनी उदयनराजेंना टोला लगावलाय.

गेल्या विधानसभेवेळी राष्ट्रवादीतून अनेक नेते शिवसेना भाजपमध्ये जात होते. अनेक नेत्यांच्या पक्षांतरानंतर पवारांच्या सोबत कुणी रहायला तयार नाही, अशी टीका विरोधक करत होते. यावर बोलताना विरोध पवार म्हणाले, “स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत”.

पुढे रोहित पवार म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत. यातील काहींकडं पद जरुर आहे पण लोकांमधील पत मात्र त्यांनी जरूर तपासून घ्यावी. कदाचित त्यांना एकटं पाडून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही ते ज्या पक्षात आहेत त्यांचा हा डाव असू शकतो. काही का असेना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र दगाबाजांना कधीही थारा देत नाही”.

“काही का असेना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र दगाबाजांना कधीही थारा देत नाही. साहेबांवर, त्यांच्या विचारांवर प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे. खोटे-नाटे, कपोलकल्पित आरोप करुन या प्रेमाची नाळ तोडण्याचा विरोधकांनी अनेकदा प्रयत्न केला. साहेबांना मागे खेचण्यासाठी ED सारख्या संस्थांचा गैरवापर करत चौकशीचा ससेमिराही मागं लावण्याचा प्रयत्न झाला. पण साहेब डगमगले नाहीत. ED ची नोटीस आल्यावर भल्याभल्यांची झोप उडते पण साहेबांनी जेंव्हा स्वतःहून ED कार्यालयात चौकशीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला तेंव्हा ED ची झोप उडाली. …आणि लक्षात घ्या देशाच्या इतिहासात हे असं पहिल्यांदा घडलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे खुनशी विरोधकांना साहेब समजले नाही आणि समजणारही नाहीत. त्यामुळं त्यांनी साहेबांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्नच करु नये. साहेबांचं नेतृत्व कुठल्या लाटेत वर आलेलं नाही तर त्यामागे त्यांनी तब्बल पाच दशकांहून अधिक काळ केलेली कठोर तपश्चर्या आहे.”, असंही रोहित पवार म्हणाले.

साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत. आजही साहेब त्याच उत्साहात, जोमात काम करताना दिसतात. लोकांमध्ये जातात, त्यांचं दुःख समजून घेतात आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते लोकांच्या हृदयात आहेत, असं रोहित म्हणाले.

‘सर्वसामान्य लोकांसाठी काम करा’, हा साहेबांनी दिलेला मंत्र दीपस्तंभ मानून काम करण्याचा मीही प्रयत्न करतोय. लोकांनीही मला काम करण्याची संधी दिलीय. त्यामुळं प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन साहेबांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा माझा प्रयत्न सुरुय आणि सोबतच साहेबांची ऊर्जाही आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

(Rohit pawar Facebook Post on Sharad pawar Rain Ralley In Satara)

संबंधित बातम्या

पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले 

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.